

कोलेस्ट्रॉल शरीराच्या प्रत्येक पेशीसाठी आवश्यक घटक आहे. कोलेस्ट्रॉलशिवाय शरीर हार्मोन्स तयार करू शकत नाही. शरीरात 5 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. कायलो मायक्रोन, व्हीएलडीए, आयडीएल, एलडीएल आणि एचडीएल.
कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात महत्त्वाचे हार्मोन्स बनतात. हे शरीराचे संक्रमणापासून संरक्षण करते. कोलेस्ट्रॉलच्या मदतीने शरीरात बायल अॅसिडची निर्मिती होते. आतड्यांतून वसा शोषणासाठी त्याची मदत होते. कोलेस्ट्रॉल हाडांच्या विकासासाठी मदत करणार्या व्हिटॅमिन ‘डी’ची निर्मिती करण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॉलचे एक निश्चित प्रमाण शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते, पण रक्तातील याचे प्रमाण 250 मिलीग्रॅम प्रती डेसीमीटर किंवा यापेक्षा जास्त होणे धोकादायक होऊ शकते. धमण्यांमध्ये जास्त कोलेस्ट्रॉल जमल्याने रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात व हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने पित्ताच्या पिशवीत खडे होण्याचे प्रमाण वाढते.
प्रमाणापेक्षा लठ्ठ लोकांसाठी, रक्तदाबाचा व मधुमेहाचा आजार असणार्या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
एकाच जागी बसून राहणारे व पायी न चालणार्यांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
सिगारेट ओढणारे व जास्त प्रमाणात दारू पिणार्या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते.
आहारात प्रोटिन, कार्बोहायड्रेड व वसाचा योग्य प्रमाणात समावेश करा.
भाज्या शिवण्यासाठी शेंगदाणा तेल, सरसाचे तेल, सोयाबीन, तिळाचे तेल यांचा वापर करा. आहारात मांसाहारी पदार्थ व पनीर कमी करा. सिगारेट व दारू वर्ज्य करा.
ताजी फळे व हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवा. तणावापासून दूर राहा. नियमित व्यायाम करा.