

अतिरागामुळे किंवा रक्तदाब वाढल्यामुळे मन अशांत राहते. या दोन्हीही स्थितीमध्ये आपली डावी नाकपुडी किंवा नासिका चालू असते. हे लक्षात घेता दररोज डावी नासिका एक तासापर्यंत बंद ठेवून उजव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास सुरू ठेवल्यामुळे म्हणजेच श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया केल्यामुळे रागावर नियंत्रण मिळवता येते, असे मुद्राशास्त्र सांगते. यासाठी योगसाधनेमध्ये शांत मुद्रा प्रभावी सांगितली गेली आहे.
शांत मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांच्या सर्व बोटांची अग्रस्थाने एकत्र घ्या आणि ती नाकपुडीच्या बाजूला ठेवा. ठेवताना अशा प्रकारे ठेवा की हाताच्या मध्यमेचा नाकपुडीवर दाब पडेल आणि उर्वरित बोटे केवळ नाकाला स्पर्श करून राहतील. आता अशा अवस्थेत शांतपणाने श्वासोच्छ्वास घ्या. अशा प्रकारे दररोज 15-15 मिनिटे तीन वेळा हळू, दीर्घ आणि खोल श्वसन करा आणि परिणाम अनुभवा. भोजनानंतर तत्काळ ही क्रिया करणे टाळा.