

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, महिलांप्रमाणे पुरुषांनाही स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होऊ शकतो का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. पुरुषांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी असले, तरी तो पूर्णपणे वगळता येत नाही. पुरुषांनाही स्तनांचे आणि स्तनाग्र भाग असल्याने, कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्याचा धोका असतो. बर्याचदा पुरुषांमध्ये या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे तो जास्त बळावल्यानंतर निदान होते.
पुरुषांमध्ये आढळणार्या स्तन कर्करोगाच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा पुरुष ही लक्षणे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. सर्वात महत्त्वाचे आणि सामान्य लक्षण म्हणजे छातीवर किंवा स्तनाग्राजवळ गाठ जाणवणे. ही गाठ सामान्यतः वेदनाहीन असते आणि छातीच्या एकाच बाजूला आढळते. ही गाठ त्वचेखाली घट्ट आणि कठीण वाटू शकते.
गाठ : छातीवर किंवा स्तनाग्राजवळ एक वेदनाहीन व घट्ट गाठ जाणवणे.
स्राव : स्तनाग्रातून रक्त किंवा कोणताही द्रव स्राव होणे.
त्वचेतील बदल : स्तनाग्राच्या त्वचेवर लालसरपणा, खाज किंवा खवले येणे.
स्विचलेले स्तनाग्र : स्तनाग्र आतल्या बाजूला ओढले जाणे.
सूज : स्तनाग्राच्या आजूबाजूला सूज येणे किंवा त्वचेचा रंग बदलणे.
काखेत गाठ : काखेत किंवा कॉलर बोनजवळ गाठ किंवा सूज जाणवणे.