

कसा दिसतो यापेक्षा कसे आहोत याला महत्त्व देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
एका अभ्यासानुसार, राज्यात ७८.४ व्यक्तींना सौम्य डिसमॉर्फिया
चेहरा, दात यांबद्दल न्यूनगंड असणाऱ्यांचे प्रमाण अधिक
वाण कसा आहे यापेक्षा गुण कसा आहे याला महत्त्व द्या. तुम्ही कसे दिसता, त्यापेक्षा कसे वागता, बोलत असता याला महत्त्व आहे, असा संस्कार भारतीय संस्कृतीत शालेय जीवनापासूनच शिकवले गेले. मात्र, सध्याच्या भौतिक जगात आपण कसे आहोत, यापेक्षा कसे दिसतो याला महत्त्व आल्याने भारतात नव्या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुमार 'बॉडी डिसमॉर्फिक डिसआॅर्डर्स' या दिसण्याबद्दल न्यूनगंड बाळगण्याच्या नव्या आजाराची लक्षणे ७८ टक्के लोकांमध्ये कमी, अधिक अथवा सौम्य प्रमाणात दिसून आली, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले आहे.
बॉडी डिसमॉर्फिया, ज्याला बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर असेही म्हणतात. ही एक न्यूनगंडाने पछाडलेल्या आजाराची स्थिती आहे, जी एखाद्यामध्ये स्वतःच्या दिसण्याबद्दल चिंता निर्माण करते. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला तिच्या दिसण्याबद्दल कमालीचा न्यूनगंड येताे. आपल्या शरीरात काहीतरी दोष आहेत. आपण अतिलठ्ठ, काळे, बुटके आहोत या आणि तत्सम विचारांनी ग्रस्त व्यक्तीला त्याच्या शरीरात ज्या कमतरता जाणवतात, त्या इतर लोकांना दिसतीलच असे नाही. पण या आजाराने ग्रस्त व्यक्ती कायम आपल्या दिसण्याबद्दल 'व्यथीत' असते. याचा त्याच्या सर्वसाधारण जीवनावर परिणाम होऊ शकतो. 'बॉडी डिसमॉर्फिया' ओसीडी अर्थात 'ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर'शी संबंधित आहे. परंतु अनेकदा या न्यूनगंडाने ग्रस्त व्यक्तीच्या आजाराचे चुकीचे निदान केले जाते. बालपणातील समस्या समुपदेशन आणि थेरपीद्वारे सोडवल्या गेल्या नाहीत तर या आजाराची लक्षणे वाढत जातात आणि फार काळ दूर होत नाहीत. शरीराचा 'डिसमॉर्फि'या कोणालाही प्रभावित करू शकतो. हा आजार सामान्यतः पौगंडावस्थेत किंवा प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात सुरू होतो, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र इंटरनेट, समाजमाध्यमांच्या या युगात प्रत्येकालाच सुंदर, रुबाबदार, देखणं दिसायचे असल्याने हा आजार अलीकडे पस्तिशी-चाळिशीनंतरही वाढल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
भारतात गोरेपणा हेच सौंदर्य हा चुकीचा निकष सर्वत्र मानला जातो. अनेक महिला सावळा रंग, केस, दातांची ठेवण याबद्दल न्यूनगंड बाळगतात. पुरुषांमध्ये टकलेपणा, सावळा रंग, दाढी न येणे, दातांची ठेवण चांगली नसणे, उंची कमी, देहावर मसल्स नसते किंवा दुबळा बांधा यांबद्दल प्रचंड न्यूनगंड आढळतो. अशी व्यक्ती मग न्यूनगंडाने ग्रासली जाते आणि डिसमॉर्फिया आजाराची शिकार होते.
आपण 'हॅण्डसम' नाही, दिसण्याबद्दल लोक काय म्हणतील, या न्यूनगंडाने ग्रासलो होतो. या विषयावर विपूल वाचन केले. तज्ज्ञांशी संवाद साधून दिसण्याबद्दल न्यूनगंड कमी केला. ताे कमी व्हावा म्हणून ' मॉडेल अन् फोटोग्राफी' यावर रिसर्च करून 'एफटीआय'साठी शॉर्ट फिल्म काढली. आता या नकारात्मक न्यूनगंडावर पूर्णपणे मात केली आहे.
-आदित्य मुंडगे, विद्यार्थी, 'एफटीआय' पुणे
निसर्गाने दिलेल्या शरीररचनेवर अनेकांची स्वीकार्हता नसते. त्यामुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. नाकाच्या समस्यांसाठी अनेक रुग्ण येतात. ज्यांना खरच गरज नसते त्यांना समुपदेशन सुचवतो. सौंदर्य हा भाग तुमच्या कर्तृत्वात आड येत नाहीच.
- डॉ. श्रीया कुलकर्णी, नाक शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नाशिक
१) स्वत:च्या दिसण्याबद्दल अकारण नियमित चिंता.
२) जवळच्यांना आपल्या दिसण्याबद्दल सतत विचारणे आणि उत्तर देऊनही त्यावर समाधानी नसणे
३)आरशात पाहून नाराज होणे किंवा आरशात स्वत:ला न पाहणे, सतत सौंदर्यासंबंधी डायटिंग, व्यायाम करणे.
४) चेहरा, हात यांची अत्याधिक साफसफाई करणे; नियमित दाढी करणे.
५) शारीरिक कमतरता आहे असे समजून ते लपवण्याचा अनिवार प्रयत्न, गरज नसतानाही अनेक वेळा कॉस्मेटिक