— एरंडेलला अमृताची उपमा दिली आहे. याची फुले, साल, पाने, मुळी, लाकूड सर्व काही उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यासाठी हे उत्तम आहे.
— एरंडेल अंगास लावल्यास, पोटात घेतल्यास, डोके व तळ पायांना लावल्यास अतिशय उपयोग होतो.
— यामध्ये तांबडा आणि हिरवा असे दोन प्रकार आढळतात.
— तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, जड, स्वादू, सारक असे हे एरंडेल आहे.
— कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबरदुखी, मस्तकातील शूल, दमा, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, उष्णता, वातरक्त, मेद, रक्तदोष, कृमी यांचा नाश करते.
— एरंडाच्या सालीचा रस काढून त्यात दूध घालू ते दूध रोज प्यावे. कसलीही कावीळ बरी होते.
— पोटात बारीक दुखत असेल, भूक लागत नसेल, अन्नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते, अपचन, करपट ढेकर, अन्नावर वासना नसणे अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादेलोण, सुंठीची पूड घालून चार आठवडे घ्यावे.
— सांध्यांना वेदना होतात, सूज आहे, चालता येत नाही, उठता-बसता येत नाही, थोडा ताप आहे, कष्ट सहन होत नाही, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी दिवसातून दोन वेळा खावी.
— एरंडेल एरंडाच्या पानास लावून दुखर्या भागावर बांधावे. हाताची, पायाची हालचाल नियमित होते. यामुळे संधिवात अगर आमवात बरा होण्यास मदत होते.