खास चव आणि पौष्टिक तुळशीची पाने वेगवेगळ्या पाककृतींमध्ये आणि उपचारांमध्ये वापरली जातात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आणि दाह कमी करण्याची क्षमता तुळशीत सामावलेली आहे.
कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम तसेच ए, सी आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात तुळशीच्या पानांमध्ये असतात. तुळस प्रथिने आणि फायबरनेही समृद्ध असते. अभ्यास असे सांगतो की, तुळशीमध्ये दाहविरोधी गुण आहेत.
ताप, डोकेदुखी, घशातली खवखव, सर्दी, खोकला तसेच संधिवात अशा त्रासांवर तुळस गुणकारी ठरू शकते. हल्लीच्या दिवसात 'डिटॉक्स'ची चर्चा वेगवेगळ्या संदर्भात होताना दिसते. तुळशीचे 'डिटॉक्स' गुणधर्म मानवी शरीरातले यकृत निरोगी राखण्यास आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यास साहाय्य करतात.
तुळशीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास तुळस मदत करते. पोटातला मूत्रपिंडाच्या समस्या, भूक न लागणे, जंत संक्रमण, चामखीळ, पोटात पेटके येणे यांबाबत तुळस गुणकारक ठरत असल्याचे मानले जाते. पचन आणि मज्जासंस्थेला बळकटी देण्यातही तुळस हातभार लावते. चेहऱ्यावरचा मुरूम- पुटकुळ्यांचा त्रास दूर ठेवण्यास, त्वचा स्वच्छ राखण्यास तुळशीची पाने उपयुक्त मानली जातात.
योग्य प्रमाणात वापरली गेली, तर चिंता आणि नैराश्याचे व्यवस्थापन करण्यास व या मानसिक त्रासांशी लढण्यास तुळस मदत करू शकते. अर्थातच, आजच्या धकाधकीच्या काळात वाढत्या ताणतणावास प्रतिबंध करू शकेल, असा 'अँटी- स्ट्रेस एजंट' म्हणूनदेखील तुळशीचा वापर होताना दिसतो. आपल्याला ठाऊक आहे की, निरोगी दृष्टीपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंतचे अनेक फायदे अ जीवनसत्त्वामुळे लाभतात. तुळस अ जीवनसत्त्वाने समृद्ध असते. त्यामुळेही ती विशेष आरोग्यदायी पोषणतत्त्व ठरते.