अपान वायू मुद्रेला मृत 'संजीवनी मुद्रा' असेही म्हटले जाते. प्राचीन भारतात हृदयविकाराचा झटका आल्यास ही मुद्रा जीवरक्षक असल्याचे मानले जाते. अपान वायू मुद्रा ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका या तीनही विकारांमध्ये खूप प्रभावी ठरते. हृदयविकाराचा झटका आल्यास अपान वायू मुद्रेचा खूप चांगला जादुई प्रभाव पडतो.
ज्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो, त्याने लगेचच ही मुद्रा केल्यास, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याची तब्येत अधिक बिघडत नाही. यामध्ये दोन्ही हातांनी ही मुद्रा केली पाहिजे. पद्मासन किंवा उपयुक्त आसनात आरामात बसावे. हाताची तर्जनी वाकवून अंगठ्याच्या मुळाला लावावा, त्याचवेळी मध्यमा आणि अनामिका ही दोन्ही बोटे अंगठ्याच्या सुरुवातीच्या टोकाला टेकवावे. उरली ती करंगळी ती सरळ असावी. अपान वायू मुद्रा दहा ते पंधरा मिनिटे करावी.
अनिल विद्याधर