AMH, AFC, FSH, LH म्हणजे काय?

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

AMH, FSH, LH, Prolactin हे मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीद्वारे रक्‍ताभिसरणामध्ये स्रवते व AMH हे स्त्री बीजांडातील पेशीद्वारे रक्‍तात मिसळते. त्याच्या प्रमाणावरून आपल्याला स्त्री बीज निर्मितीची कारणमीमांसा करता येते.

सर्व लेखांमध्ये AMH, AFC, FSH, LH हे वाचून अपत्य प्राप्‍तीसाठी आतूर असलेल्या जोडप्याच्या मनात एकप्रकारचे कुतूहल निर्माण झालेले असते. उठसूट हे काय आहे? तर आपण या Day 2 म्हणजेच पाळीच्या दुसर्‍या दिवशी कराव्या लागणार्‍या मुख्य तपासण्या व त्याच्या निष्कर्षावरती थोडी चर्चा करू. AMH, FSH, LH, Prolactin हे मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीद्वारे रक्‍ताभिसरणामध्ये स्रवते व AMH हे स्त्री बीजांडातील पेशीद्वारे रक्‍तात मिसळते. त्याच्या प्रमाणावरून आपल्याला स्त्री बीज निर्मितीची कारणमीमांसा करता येते. 

तसेच TSH चे प्रमाण जेव्हा वाढलेले आढळते, तेव्हा थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम झाल्याचे निदान होते व त्यावर थायरॉक्सिनच्या गोळ्या वापराव्या लागतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथीमधून T3,  T4 संप्रेरके कमी प्रमाणात तयार होतात, तेव्हा पिच्युटरी ग्रंथीद्वारे TSH चा स्राव वाढतो व TSH च्या रक्‍तातील झालेल्या अतिरिक्‍त प्रमाणावरून Hypothyroidism चे निदान होते. जसे स्वादूपिंडद्वारे स्रवणारे Insulin जेव्हा कमी होते तेव्हा रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच काहीतरी TSH चे होते व जसे रक्‍तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी Insulin चा डोस आयुष्यभर घ्यावा लागतो, तसेच थायरॉईडचा डोस कायम घ्यावाच लागतो. थायरॉईडच्या गोळ्या खाल्ल्यानंतर TSH चे  प्रमाण कमी झाले की, मग मी गोळ्या बंद केल्या, असे म्हणणे म्हणजे मला मधुमेह झाला व Insulin इंजेक्शन घेतले व मग साखर कमी झाली व Insulin बंद केले म्हणण्यासारखे आहे. Insulin बंद केले की, पुन्हा साखर वाढणार तसेच थायरॉईडच्या गोळ्या बंद केल्या की, TSH चे प्रमाण वाढणार व त्याचे पर्यावसन पाळीच्या अनियमितेत होणार व गर्भधारणेसाठी अडथळा निर्माण होणार. म्हणून एकदा थायरॉईडच्या गोळ्या सुरू केल्या की, कायम म्हणजे 'जिंदगी के आखिरी सांस तक' घ्याव्या लागतात.

तसेच Prolactin चे प्रमाण जर वाढले तर मासिक पाळी अनियमित तर होतेच; परंतु त्याचबरोबर स्तनातून दुधासारखा स्राव सुरू होतो व स्त्री बीजनिर्मिती होत नाही व त्याचे वंध्यत्वात पर्यावसन होते. पिच्युटरी ग्रंथीत जर गाठ असेल तर Prolactin 100 Unit पेक्षा जास्त वाढते मग मेंदूचा सिटीस्कॅन करून गाठ आहे किंवा कसे याचे निदान लावावे लागते व गाठ असल्यास शस्त्रक्रिया किंवा शेकाद्वारे ही गाठ नष्ट करावी लागते.

आता AMH/FSH/LH च्या प्रमाणामुळे काय होते, ते पाहू. 

नॉर्मल पेशंटमध्ये AMH चे प्रमाण 1.2 ते 4.0 पर्यंत असते. तसेच जेव्हा PCOS/PCOD असते तेव्हा अचक AMH 4 Unit जास्त असते व FSH पेक्षा LH चे प्रमाण वाढलेले असते. नॉर्मल पेशंटमध्ये पेक्षा LH  जास्त FSH असते; पण PCOS मध्ये नेमके उलटे होते. LH जास्त व FSH कमी असते. PCOS साठी विविध उपचार करावे लागतात. सर्वप्रथम जीवनशैलीतील बदल, आहारात कळसह High Protien व Low Calories Diet व व्यायाम हवा व सर्व उपचार संपले की, (LOD) Laproscopic Ovarian Drilling करून गर्भधारणेचे उपचार करावे लागतात. PCOS च्या LOD नंतर स्त्री बीजनिर्मिती चांगली होते.

LH/FSH/AMH च्या प्रमाणावर स्त्रियांमध्ये स्त्री बीजांड कोषाचे कार्य ओळखता येते. 

1) Premature Ovarian Failure मध्ये AMH कमी होते. 0.3 पेक्षा कमी तर FSH चे प्रमाण वाढलेले आढळते. तेव्हा त्याला अकाली रजोनिवृत्ती, वयानुसार रजोनिवृत्ती होते तेव्हा Hypergonadotropic Hypoestrogenism म्हणतात. अशा स्त्रियांना गर्भधारणेसाठी दुसर्‍या तरुण स्त्रीचे अंडे घेऊन गर्भधारणा करावी लागते. 

2) ज्या स्त्रियांमध्ये AMH पण कमी व FSH पण कमी व LH चे पण रक्‍तातील प्रमाण कमी असते याला WHO द्वारे Hypogonatropic Hypoestrogenism संबोधतात. अशा स्त्रियांना FSH चा अतिरिक्‍त डोस देऊन स्त्री बीजनिर्मिती करता येते.   

3) इतर PCOS व काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती होत नाही, त्यात सर्व संप्रेरके सर्वसाधारण प्रमाणात आढळतात. त्याला Normogonadotropic Normo Estrogenism म्हणतात.

या संप्रेरकांच्या रक्‍तातील प्रमाणाबरोबरच आणखी एक मोजमाप स्त्रीच्या स्त्री बीजांडाच्या ज्या त्या पाळीपुरते केले जाते ते म्हणजे AFC Antral Folicular Count. म्हणजेच स्त्री बीजांडामधील बीजनिर्मिती करण्याजोगी स्त्री बीजे होय. यासाठी मूत्राशय पूर्णपणे मोकळे असावे लागते व जनन मार्गावाटे सोनोग्राफी केली जाते. या सोनोग्राफीमध्ये स्त्री बीजांडात 2 मि.मी. ते 8 मि.मी. आकाराची Follicles मोजणी केली जाते व त्याच संख्येस AFC संबोधतात. स्त्रियांमध्ये AMH स्थिर असून AFC हे प्रत्येक महिन्याच्या पाळीगणिक बदलते. म्हणजे प्रत्यक्ष त्या पाळीदरम्यान स्त्री बीज निर्मितीक्षम असलेली Follicles मोजता येतात. ज्या स्त्रीचे AMH 1 नॅनोग्रॅमपेक्षा कमी व AFC 8 पेक्षा कमी असते. अशा स्त्रिया झेेी ठशीिेपवशी मध्ये मोडतात व अशा स्त्रियांसाठी वापराव्या लागणार्‍या स्त्री संप्रेरकाच्या इंजेक्शनच्या डोसचे प्रमाण थोडे वाढवावे  लागते व त्यामुळे खर्च जास्त होतो. अशा Poor Responder ना स्वत:चे मूल मिळविण्यासाठी 2 ते 3 Cycles IVF करून चांगले यश संपादन करणे शक्य आहे. जसजसा कालावधी जात आहे, तसतसे IVF/ICSI म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी प्रणालीमध्ये प्रगती दिसून येत आहे आणि वैद्यकीय शास्त्रीत प्रजननाची सखोल माहिती मिळत आहे. परंतु, ज्या विश्‍वकर्माने ही सृष्टी निर्माण केली, त्याने किती गोष्टी जिथल्या तिथे व जेव्हा हव्या तेव्हा व्हाव्यात, अशी System बसविलेली आहे व त्याच्यापुढे आपण नतमस्तक होणे दुरापास्तच आहे. अगदी नास्तिकातील नास्तिक माणसालासुद्धा या शक्‍तीची महती कळू शकते.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news