Adenovirus : पश्चिम बंगालमध्ये ॲडिनो व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ; काय आहेत या विषाणूची लक्षणे?

Adenovirus : पश्चिम बंगालमध्ये ॲडिनो व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ; काय आहेत या विषाणूची लक्षणे?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमध्ये ॲडिनो व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयांमधील बाळांसाठी राखीव असलेल्या वॉर्डमध्ये रुग्णांसाठी सध्या जागा शिल्लक नाहीत. जानेवारीपासून कोलकाता येथील ICMR-NICED या संस्थेत पाठवलेल्या किमान ३० टक्के स्वॅबमध्ये या एडिनो विषाणूची चाचणी पॉझीटिव्ह आली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Adenovirus) पश्चिम बंगालमध्ये हा विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी, तसेच या विषाणूची लक्षणे काय आहेत? यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांना एक सल्ला देण्यात आला आहे.

Center's for Disease Control and Prevention च्या मतानुसार, एडेनो व्हायरसमुळे सौम्य सर्दी किंवा फ्लू सारखा आजार होऊ शकतो. तसेच हा आजार सर्व वयोगटातील व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे. कोरोनाप्रमाणेच बाधित व्यक्तीने स्पर्श केल्यास, खोकला आणि हवेत शिंकणे, यामुळे या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

ॲडिनो विषाणू काय आहे?

ॲडिनो विषाणू हे मध्यम आकाराचे आणि विकसित नसलेले विषाणू आहेत. संशोधकांनी सुमारे ५० प्रकारचे ॲडिनो व्हायरस ओळखले आहेत. जे मानवांना संक्रमित करू शकतात. संक्रमण वर्षभर होऊ शकते. (Adenovirus) परंतु, नंतर हिवाळ्यात या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या आणि ह्रदयाचे विकार असलेल्या लोकांना या विषाणूमुळे गंभीर आजार उद्भवू शकतात.

ॲडिनो विषाणूची लक्षणे काय आहेत? (Adenovirus)

सर्दी, ताप, घसा खवखवणे ही एडिनो या विषाणूची सामान्य लक्षणे आहेत. शिवाय न्यूमोनिया, पोट किंवा आतड्यांचा अतिसार किंवा मळमळ होणे, पोट दुखणे हे या विषाणूची लक्षणे आहेत.

ॲडिनो व्हायरसवर उपचार आहे का? Adenovirus)

ॲडिनो व्हायरसवर सध्या तरी कोणतेही विशेष उपचार नाहीत. या विषाणूवर कोणत्याही लसीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. रोग टाळण्यासाठी, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा शक्य असेल तेव्हा आपले हात आणि परिसर स्वच्छ ठेवा.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news