Muscle contractions : स्नायू आखडल्यास…हे सोपे उपाय करा

स्नायू
स्नायू
Published on
Updated on

आपण विविध प्रकारची कामे करतो, तेव्हा त्यातल्या कोणत्या तरी कामामुळे आपल्या स्नायूवर मर्यादिपेक्षा अधिक भार पडतो आणि परिणामी तो स्नायू दुखावला तरी जातो किंवा आखडतो. विशेषतः शरीराला नमानवणारा व्यायाम करणे, मर्यादेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करणे, मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणे किंवा पर्वतावर चढण्याचा प्रयत्न करणे यातून स्नायूवर भार पडतो. अशा वेळी खालील प्रकारचे उपाय योजावेत म्हणजे औषधे न घेताच स्नायूंचे दुखणे कमी होऊ शकते.

स्नायू दुखत असतील तर आपल्या घराच्या आसपास किंवा एखाद्या मोकळ्या मैदानावर फिरावे. स्नायू दुखावल्यामुळे आराम करावासा वाटतो. पण तसा आराम टाळून थोडेसे तरी फिरणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तप्रवाह वेगाने सुरू होतो आणि दुखणाऱ्या स्नायूंचे दुखणे थांबते. स्नायूच्या दुखण्यवर दुसरा उपाय म्हणजे मालिश करणे. योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने मसाज केला म्हणजे स्नायूंचे दुखणे कमी होते, मसाज केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच; परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.

आपल्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते आणि ही ग्लुकोज नावाची शर्करा शरीराला ऊर्जा प्रदान करते. परंतु ग्लुकोज तयार करण्याच्या प्रक्रियेत काही वेळा बाधा येते किंवा पुरेसे ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे स्नायू दुखायला लागल्यावर तर प्रथिनयुक्त अन्नपदार्थ खावेत. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगदाण्यासारखे द्विदल अत्र पदार्थ असावेत.

स्नायूच्या आखडण्यावर एक चांगला उपाय म्हणजे दुखावलेल्या स्नायूंना थोडासा ताण देणे. एक सोपा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, व्यायाम करण्याच्या आधी, व्यायामाच्यामध्ये आणि व्यायामानंतर भरपूर पाणी पिले पाहिजे. कारण व्यायामाने आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन या कमतरतेचा स्नायूवर परिणाम होऊ शकतो. तेव्हा पाणी पिण्यासारखा साधा उपाय करावा. मात्र तहान लागली म्हणून कोल्ड्रिंक आणि अल्कोहोल यांचा वापर करणे कटाक्षाने टाळावा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news