खांदेदुखीने त्रस्त आहात? | पुढारी

खांदेदुखीने त्रस्त आहात?

डॉ. मनोज कुंभार : आपल्या खांद्याजवळच्या स्नायूंमध्ये, लिगामेंटस् किंवा स्नायूबंधांमध्ये दुखले तर त्याला खांदेदुखी किंवा खांद्याचा आर्थ्रायटिस म्हणतात. एकदा का खांदा दुखायला लागला, तर आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही.

अलीकडील काळात बहुतेक सर्व वयाच्या लोकांना केव्हा तरी खांदेदुखीचा त्रास होतोच. याचे कारण बदललेली जीवनशैली. ज्या व्यक्ती दीर्घकाळ संगणक, लॅपटॉप, स्मार्ट फोन, टॅबलेट वापरतात त्या व्यक्तींना खांदेदुखीचा त्रास प्रकर्षाने जाणवू शकतो. खांदेदुखीसाठी अनेक गोष्टी, सवयी आणि परिस्थिती कारणीभूत ठरू शकतात. आयटिस, कुर्चा मोडणे, खांद्याचे हाड मोडणे, फ्रोजन शोल्डर आणि मणक्याची हानी अशी अनेक कारणे खांदेदुखी होण्यास कारणीभूत शकतात.

काही वेळा खांद्याला येणारी सूज, हात न हालणे, सांध्याजवळची जागा नाजूक होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. आपल्याला घरातच खांदेदुखीची समस्या जाणवत असेल, तर काही तंत्र वापरून पाहू शकतो.

संबंधित बातम्या

गरम आणि थंड गोष्टींचा वापर

* खांदेदुखीची नुकतीच सुरुवात झाली असेल, तर थंड पदार्थांचा वापर करून दाह कमी करता येतो. खांद्यात खूप कळा येत असतील किंवा दुखत असेल आणि आर्थ्रायटिससारख्या वेदना होत असतील, तर काही गोष्टींचा वापर करा.
* पंधरा किंवा वीस मिनिटांसाठी खांद्याला बर्फाने शेक द्या. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
* दाह न होता फक्त खांदा दुखत असेल, गरम शेक घेतल्यास आराम मिळू शकते.

शारीरिक उपचार किंवा फिजिकल थेरेपी

आर्थ्रायटिसच्या सुरुवातीच्या काळात फिजिकल थेरपीचा नक्कीच फायदा होतो. खांद्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ही उपचार पद्धती उपयोगी उरते. त्यामुळे स्नायूंची हालचाल कायम राहू शकते. स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्याने खूप अधिक फरक पडू शकतो. स्नायूंना मजबुती तर मिळतेच शिवाय त्यांची तन्यता कायम राहण्यास मदत होते. पोहणे आणि पाण्यातील व्यायाम खांदेदुखीमध्ये खूप जास्त फायदेशीर असतात. पाणी हे स्नायूंसाठी अवयवांसाठी मऊ गादीसारखे काम करते. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढवण्यास त्याचा फायदा होतो; मात्र सुरुवातीला खांद्यातील सांध्यांना फार ताण पडेल अशा प्रकारे पोहू नका.

मसाज किंवा चोळणे : खांदेदुखी कमी करण्यासाठी मसाज किंवा चोळण्याने खूप फायदा होतो. हळुवार मसाज केल्याने खांद्याच्या स्नायूंना आराम मिळतो. स्नायूंवर आलेला ताण आणि त्यांना बसलेली ओढ कमी होते. त्याशिवाय तेथील रक्तप्रवाहात सुधारणा होते आणि सूज आणि त्यामुळे आलेला कडकपणा कमी होतो. मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, तीळ किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. तेल थोडेसे गरम करून मग खांद्याला चोळा. हलक्या हाताने खांदा चोळा आणि दुखणे कमी करण्यासाठी आणि रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी थोडेसे दाब देऊन मसाज करा. मसाज दहा मिनिटांसाठी करा. त्यानंतर दुखऱ्या भागाला आराम मिळण्यासाठी त्यावर गरम टॉवेल ठेवा. त्यामुळे निश्चितच चांगले परिणाम म मिळतील, दुखणे यसाक कमी होईपर्यंत नियमितपणे मसाज थेरेपीचा अवलंब करा.

सैंधव मिठाचे स्नान

संपव मीठ मॅग्नेशियम सल्फेटपासून तयार होते. त्याचा उपयोग खांदेदुखी कमी करायला होतो.. त्यामुळे रक्तपुरवठा सुधारतो आणि गेलेले खांद्याचे स्नायू पूर्वस्थितीत येण्यास मदत होते. त्याशिवाय संपूर्ण शरीराला आराम मिळतो. ताण कमी करण्यास सैंधव मीठ मदत करते. यासाठी खालील कृती करा. * अंघोळीसाठी सहन होईल एवढे गरम पाणी घ्या.
* या पाण्यात दोन चमचे सैंधव मीठ टाका आणि चांगले विरघळवून घ्या.
* आपला दुखरा खांदा या पाण्यात वीस ते पंचवीस मिनिटे बुडवून टेवा.

* आठवड्यातून तीन वेळा असे स्नान करा. दाब देणे : दुखऱ्या खांद्यावर समान दाब देण्याची ही प्रक्रिया आहे. यात खांद्याची सूज आणि दुखणे कमी होते. असा दाब दिल्यामुळे खांद्याला नक्कीच सहाय्य मिळते. त्यामुळे आपल्या दुखण्यात आराम मिळतो आणि आधीपेक्षा खूप आरामदायी वाटते…. इलास्टिक बँडेजचा वापर दुखऱ्या जागेवर दाब देण्यासाठी करू शकता. किंवा खांद्याला लावण्याचा पट्टा हा सहजपणे बाजारात उपलब्ध असतो.

Back to top button