

लठ्ठ माणसांना वजन कमी करण्याचे आव्हान असते, तसेच कमी वजन असणार्यांसाठी वजन वाढवण्याचे आव्हान असते.
तुम्हालाही ही समस्या असेल तर खाली दिलेल्या टिप्सकडे लक्ष द्या. म्हणजे वजन वाढण्याऐवजी लठ्ठपणा वाढण्याचा धोका राहणार नाही.
थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात राहा. यामुळे तुमचे शरीर त्या अन्नाला बर्न करत राहील आणि तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भूक लागेल.
घन किंवा सॉलिड आहाराबरोबर पेय म्हणजे पाणी किंवा इतर कोणतेही पेय घेऊ नका. या दोन्हीमध्ये कमीत कमी 45 ते 60 मिनिटांचे अंतर असावे.
उठल्यानंतर पहिल्या तासातच काही ना काही खाऊन घ्या. त्यामुळे तुमच्या शरीराची चयापचय क्रिया लवकर सुरू होईल आणि तुम्हाला लवकर भूक लागेल.
आठवड्यातून तीन ते चार वेळा वीस ते 30 मिनिटांसाठी कार्डियो अॅक्टिव्हिटी करा.
पौष्टिक आहार म्हणजे गव्हाच्या चपात्या, डाळी, फळे, भाज्या, प्रथिने, सुका मेवा आणि कमी कॅलरीची डेअरी प्रॉडक्टस घ्या. यामुळे तुमचे वजन वाढेल आणि तुम्ही निरोगीही राहाल.
चीज असलेले पदार्थ, उकडलेली अंडी, केळी आणि कमी फॅटच्या दुधाचे मिल्क शेक याचाही तुम्हाला फायदा होईल. याशिवाय दही, लस्सी आणि फळेही तुम्ही खाऊ शकता.
आजारपणामुळे वजन कमी झाल्यास ते वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात फळांचा आणि सुका मेव्याचा समावेश करा.
तसेच चहा कॉफी बंद करून त्याऐवजी रोज दोन ग्लास दूध प्या. दुध बाधत असेल तर चिमूटभर सुंठ किंवा हळद टाका. याशिवाय रोज एक केळे खाल्ल्यामुळे वजन वाढायला मदत होईल.
फळांचा रस पिण्याने शरीरातील ग्लुकोजचा स्तर वाढेल.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही बटाटे, मका, सुका मेवा, भात आणि अंडे हेही खाऊ शकता.