मूतखडा व होमिओपॅथिक उपचार | पुढारी

Published on
Updated on

डॉ. सौ. सपना गांधी

एक तरुणी साधारण 20-21 वयोगटातील सोनेग्राफी रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आली. मला विचारू लागली. मॅडम हे बघा, माझ्या डाव्या बाजूच्या किडनीमध्ये 2 मूतखडे आहेत आणि मला पाठदुखीचा प्रचंड त्रास होत आहे. तोपर्यंत मी ते रिपोर्ट पाहिले. तर एक खडा 6 एम.एम.चा, तर दुसरा खडा 12 एम.एम.चा होता. बाकीचे रिपोर्ट नॉर्मल होते. 

मूतखडा किडनी, मूत्रवाहिनी व लघवीची पिशवी यामध्ये कोठेही होऊ शकतो. लक्षणे साधारण प्रत्येक व्यक्‍तीची भिन्‍न भिन्‍न असू शकतात. कोणाला कंबरदुखी (एक बाजू/दोन्ही बाजू) तर कोणाला लघवीच्यावेळी कळा येतात. जळजळ होते. लघवीतून रक्‍त येते (लाल लघवी) तर बर्‍याच रुग्णांना मूतखडा असून त्रास असा काहीच नसतो.  परंतु, अचानक लघवी थांबून थांबून येते, काही जणांत पोट दुखू लागते. तर ही झाली मूतखड्याची साधारण लक्षणे.

मी त्या तरुणीला प्रथम होमिओपॅथिक ट्रिटमेंटची सविस्तर माहिती सांगितली की, सुरुवातीला आपल्याला तुमची पाठदुखी कमी करून मूतखडा बारीक होण्याची औषधे द्यावी लागतात व त्याच्या जोडीनेच प्रकृतीचे औषध घेणेही जरूरीचे आहे. म्हणजेच नेहमी मी उल्‍लेख करीत असते की, शारीरिक, मानसिकता, आहारातील आवड-निवड, झोप, स्वप्न, आनुवंशिक आजार, प्रकृती थंड/उष्ण इ. सर्वांचा   होमिओपॅथिक शास्त्रानुसार सूक्ष्म अभ्यास करून रुग्णाच्या प्रकृतीला साम्य असे असणारे औषध निवडले जाते आणि जेव्हा या होमिओपॅथिक शास्त्रानुसार औषध चालू होते तेव्हा रुग्णांची लक्षणे कमी होतातच, शिवाय सोनोग्राफी रिपोर्टमध्ये खडा लहान झाल्याचे किंवा खडा पूर्णपणे निघून गेल्याचेही समजते. ही झाली त्रासाच्यावेळी पडलेल्या फरकाची बाब. म्हणून होमिओपॅथिक प्रकृतींचे औषध पुढे काही दिवस घेणे जरूरी आहे. शिवाय आहारातील पथ्य, योगासने ही काळजी रुग्णांनी घेणे जरूरी आहे. भरपूर प्रमाणात  पाणी पिणे, क्षारयुक्‍त, विहिरीचे व बोअरचे पाणी पिऊ नये. टोमॅटो, कोबी, कॅल्शियमयुक्‍त पदार्थांचे सेवन टाळावे. वेळोवेळी लघवीला जावे, लक्षणांची जाणीव होताच सुरुवातीलाच डॉक्टरांनी भेटून सल्‍ला द्यावा व नियमित औषधोपचार करून घ्यावेत. जर रुग्णांनी वरील गोष्टी आत्मसात केल्या व होमिओपॅथीचे प्रकृतीचे औषध व्यवस्थित घेतले तर रुग्ण मूतखड्याच्या तक्रारीतून व नेहमी होणार्‍या मूतखड्याच्या चक्रातून सहीसलामत नक्‍कीच सुटेल. 

होमिओपॅथिक औषधोपचार :

1) लायकोपोडिअम- हे औषध उजव्या बाजूच्या मूतखड्यासाठी उपयुक्‍त आहे.  लाल लघवी होणे, लघवीच्या वेळेस जळजळ होणे, उष्ण प्रकृतीचे रुग्ण असतात. लायकोपोडिअमचे रुग्ण बाहेरून कडक स्वभावाचे वाटतात; पण मनाने दयाळू असतात. त्यांना गोड खाण्याची आवड असते. 

2) बरबेरीस व्हलगॅरीस- खडा बारीक करून विरघळून हळूहळू लघवीवाटे बाहेर टाकण्याचे काम हे औषध चांगले करते. डाव्या बाजूच्या खड्यासाठी हे औषध चांगले उपयुक्‍त पडते. डाव्या बाजूला मागून पुढे तीव्र वेदना होत असतात. 

3) कॅन्थॅरीस- मूतखडा तसेच लघवीचे इन्फेक्शन झाले असल्यास हे औषध वापरतात. लघवीची जळजळ थांबते. यातूनही रुग्णाला चांगला आराम पडतो व इतरही औषधे आहेतच; फक्‍त ती तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडूनच घ्यावीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news