IVF/ICSI पूर्वतयारी (स्त्री) | पुढारी

Published on
Updated on

डॉ. प्रवीण हेंद्रे

यापूर्वी आपण   कोणकोणत्या परिस्थितीमध्ये करणे गरजेचे आहे, हे पाहिले आहे. आज प्रथम IVF/ICSI प्रणाली वापरत असता ती कशी करतात, हे पाहू. नैसर्गिक अथवा कृत्रिम गर्भधारणेसाठी व त्यानंतर अपत्यप्राप्ती होण्यासाठी तीन मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. त्या म्हणजे 1) स्त्रीबीज 2) शुक्राणू 3) गर्भाशय.

ज्या स्त्रियांमध्ये स्वत:ची स्त्रीबीज निर्मिती क्षमता आहे, अशा स्त्रियांचे स्वत:चे स्त्री बीज घेऊन IVF/ICSI करतात.

ज्या पुरुषांच्या वीर्यामध्ये चपळ व सक्षम शुक्राणू आहेत, त्यामध्ये पतीचे स्वत:चेच शुक्राणू घेऊन IVF/ICSI करतात व ज्या स्त्रीमध्ये गर्भधारणेस सक्षम गर्भाशय आहे व ज्या स्त्रीची प्रकृती गर्भधारणेस योग्य आहे तसेच गर्भधारणेमुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत नाही, अशा स्त्रियांनीच हा मार्ग स्वीकारणे इष्ट आहे.

परवा 74 वर्षांच्या स्त्रीला गर्भधारणा झाली ही बातमी आपण वाचली असेलच. 74 वर्षांच्या रजोनिवृत्त स्त्रीला गरोदरपणाचा आनंद देणे ही IVF/ICSI व OD तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. यात कोणतेही दुमत नाही. परंतु, त्या स्त्रीला गरोदरपणात तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहणे भाग पडले व बाळंतपणानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार करावे लागले, हे इथे नमूद करावे लागेल. प्रयोग आहे हे ठीक आहे; परंतु  At what risk? आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून हा क्षणिक आनंद मिळविण्याच्या खटाटोपात आपल्या जीवाची किंमत मोजावी लागू शकते. त्यापेक्षा काही वेळेस सरोगसी किंवा वेळेवर मूल दत्तक घेण्याचा पर्याय हा थोडा झीरलींळलरश्र वाटतो. तेव्हा असे उपचार प्रयोग करण्याबद्दल व करणार्‍या डॉक्टरांबद्दल वैद्यकीय क्षेत्रात खूपच विरोध आहे. आज 74 व्या वर्षी मूल झाल्यानंतर त्याचे स्तनपान, संगोपन करून मूल मोठे होईपर्यंत त्याला आधार देणे शक्य आहे का, असे अनेक प्रश्‍न विचारात घेऊनच IVF/ICSI करणार्‍यांनी व करून घेणार्‍यांनी याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. असो. तर IVF/ICSI तीन पद्धतीने करता येते.

1) ज्या स्त्रीमध्ये चांगल्या गुणवत्तेचे गर्भधारणाक्षम स्त्रीबीजे मिळतात त्याचे स्वत:चेच स्त्रीबीज व पतीचे शुक्राणू घेऊन बहुतेक IVF/ICSI (टेस्ट ट्युब बेबी) करतात.

2) ज्या स्त्रियांना स्वत:ची स्त्रीबीज निर्मिती होऊ शकत नाही, अशा स्त्रियांसाठी डोनरकडून घेतलेली स्त्रीबीजे वापरावी लागतात, अशा डोनर स्त्रिया निवडत असताना त्या 20 ते 30 वर्षांच्याच असाव्या लागतात. तसेच त्यांच्याकडून संक्रमित होणारे सर्व आजार उदा. HIV, Hepatitis च्या चाचण्या करून त्या निरोगी आहेत, हे जाणून घ्यावे लागते व त्याची खात्री झाल्यानंतर त्यांना Ovum Donor म्हणून स्त्रीबीजे Donate करता येतात. तर अशा डोनरच्या घेतलेल्या स्त्रीबीज व स्वत:च्या पतीचे शुक्राणू वापरून IVF/ICSI करतात. या प्रकाराला Ovum Donor IVF/ICSI असे संबोधले जाते.

3) ज्या स्त्रीमध्ये स्त्रीबीजे तयार होण्याची शक्यता कमी आहे किंवा तिच्यामध्ये गुणसूत्रात दोष आहे, अशा स्त्रिया व ज्यांचे पती Azoospermia (शुक्राणू अभाव) आहे व त्यांना PESA/TESA/Micro TSE करण्यासाठी आर्थिक, मानसिक अथवा शारीरिक तयारी नाही अशा दाम्पत्याला तयार असलेले भ्रूण रोपण (Embryo Donation IVF/ICSI) प्रणालीद्वारे गर्भधारणा करता येते.

ज्या स्त्रियांचे गर्भाशय गर्भधारणेस निकामी झाले आहे किंवा काढूनच टाकले आहे, अथवा जन्मजात गर्भाशय नसल्यास अशा स्त्रियांना IVF/ICSI, OD अथवा ED या तिन्ही तंत्राद्वारे सरोगसीच्या साहाय्याने अपत्यप्राप्तीचा पर्याय उपलब्ध आहे.

आज गर्भाशय रोपण (Uterus Transplant) खूपच प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत व त्याचे आई व बाळास जास्त धोके संभवतात तेव्हा आता तरी त्यापासून अलिप्त राहणेच ठीक होईल. 

आता कृत्रिम गर्भाशय म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये जे कृत्रिम गर्भाशय करून भ्रूण वाढवायच्या तंत्रज्ञानावर खूप मोठे संशोधन सुरू आहे. त्याअंतर्गत तीन महिन्यांपर्यंत शेळीचा गर्भ प्रयोगशाळेत वाढविण्यास यश प्राप्त झाले आहे. हा प्रयोग झाल्यानंतर ज्या स्त्रियांना गरोदरपण आपल्या प्रकृती स्वास्थ्यामुळे झेपणार नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आज खूप विकसित झालेले आढळते. परंतु, गर्भाशयात गर्भरोपण केल्यानंतर Implantation Window, Endometrial Receptivity & Trasplant Rejetion. गर्भाशयामध्ये गर्भ रुजण्याचा अचूक कालावधी, गर्भाशयाच्या उतीचे गर्भ रुजवून घेण्यास असलेला मज्जाव व गर्भ प्रत्यारोपणानंतर गर्भाविरुद्ध स्त्रीच्या र्खााीपश प्रतिकारशक्‍तीचा विरोध अशा समस्यांना कृत्रिम गर्भाशयाचे चोख उत्तर मिळून असंख्य अपत्य प्राप्तीसाठी इच्छुक दाम्पत्याच्या जीवनात आनंद निर्माण होईल.

तसे पाहता IVF/ICSI साठी पुरुषाचे शुक्राणू सहजपणे उपलब्ध असतात. परंतु, स्त्रीबीजे मिळण्यासाठी प्रथम ते जागृत करावे लागतात. म्हणजेच ते Premordial germcell stage मध्ये सुप्‍त अवस्थेत असतात. त्यांना जागृत करून Recruit म्हणजे स्त्रीबीज निर्मितीस प्रोत्साहित करून त्यांच्यामध्ये स्त्रीबीज निर्मितीचा Process  सुरू करावा लागतो. तसे झाल्यानंतर हळूहळू त्यामध्ये वाढ होत असते.

अशा सुप्त अवस्थेतील Germ Cell ना Stimulate करण्यासाठी विविध प्रकारचे स्त्री संप्रेरके वापरली जातात. त्यामध्ये 

HmG (Urinary)

Highly Purified Hmg

FSH – Urinary

FSH – Highly Purified

FSH – Recombinant  अल्फा व बिटा.

तसेच स्त्री बीज संकलन होण्यापूर्वी स्त्रीबीजांची वाढतरी व्हावी; परंतु फुटून वाया जाऊ नये त्यासाठी Antagonist ची Injections व स्त्रीबीज परिपक्‍व होण्यासाठी (Rupture) फुटण्यासाठी

– HCG

– HCG (Purified)

     – LH

     – HCG Recombinant

या सर्व संप्रेरकांचा समावेश होतो. स्त्रीचे वय AFC, AMH चे प्रमाण, वजन या सर्वांवर अवलंबून या विशिष्ट संप्रेरकाची मात्रा (Dose) ठरतो व क्रमाक्रमाने ही Injections दिली जातात. साधारण या इंजेक्शनचा कालावधी 10 ते 13-14 दिवसांपर्यंत स्त्रीबीज निर्मितीच्या Response वर अवलंबून असतो व जसजशी त्याची वाढ साधारण 18 ते 20 मि.मी. होते तेव्हा Rupture चे संप्रेरक दिले जाते व ते इंजेक्शन दिल्यानंतर 34 ते 36 तासांमध्ये स्त्रीबीज संकलन म्हणजे Ovum Pickup करावे लागते. ही स्त्रीबीज संकलित केल्यानंतर त्याच्याबरोबर असलेले रक्‍त व इतर उती (Cells) पासून विलगीकरण करतात. (Denudation) व त्यानंतर ही स्त्रीबीजे थोडा वेळ 37 अंश तापमानात उबविली जातात.

त्या स्त्रीबीजांचे M2 स्त्री बीजामध्ये रूपांतर झाले की, ही स्त्रीबीजे आता ICSI साठी तयार होतात. ही संपूर्ण Process कालबद्धपणेच करावी लागते. त्यातल्या त्यात ICSI साठी अगदी उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाची गरज असते. ज्या वेळेस स्त्रीबीज संकलन Denudation विलगीकरण व Maturation व Incubation उबविण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हाच पुरुषाचे शुक्राणू घेऊन त्याचे पृथक्‍करण करणे सुरू असते व त्यातील उच्च प्रतीचे चपळ असे शुक्राणू बाजूला काढून ठेवले जातात. यानंतर दोन प्रकारे फलन करता येते ते म्हणजे IVF व दुसरे ICSI. 

तर आपण आता पुढील लेखात स्त्रीबीजाचे Stimulation दरम्यान स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावे लागते तसेच किती वेळेस लॅबोरेटरीमध्ये यावे लागते, तपासणी कोणती व कशी करतात, तसेच IVF व ICSI प्रक्रिया कशाप्रकारे करतात, याबद्दल सविस्तर पाहू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news