काय आहे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग?

वीणा औरंगाबादवाला

गर्भाशयाच्या आतील बाजूस जे अस्तर असते, त्याला एंडोमेट्रियम म्हणतात. सर्वसामान्यपणे नॉर्मल वजन असलेल्या महिलांपेक्षा वाढीव वजन, तसेच स्थूलत्व असलेल्या स्त्रियांत हा कर्करोग दुपटीने आढळतो. ज्या स्त्रियांत वाढत्या वयासोबत, जीवनशैलीतील दोषांमुळे शारीरिक वजन जास्त प्रमाणात वाढत जाते, त्यांनाही हा आजार जास्त होतो, असेही आढळून आले आहे.

'ह्युमन पेपिलोमा' या विषाणूच्या संक्रमणाने हा कर्करोग होतो. कमी वयात तसेच जास्त पुरुषांशी संबंध ठेवणार्‍या स्त्रियांना हा कर्करोग होण्याची शक्यता असते. सर्वसाधारपणे 40 ते 50 वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण दिसून येते.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 'ह्युमन पेपिलोमा' नावाच्या विषाणूमुळे होतो. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या काळात करणे कठीण असते. सुरुवातीच्या काळात उपचार झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

हा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाशी पेशी जास्त वाढल्यामुळे होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोहोचतात. या कर्करोगाची सुरुवातीला काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. प्राथमिक अवस्थेत हा आजार ओळखता आला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. या आजाराचे निदान करण्यासाठी पॅप स्मिअर ही चाचणी करण्यात येते. या चाचणीद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा पुढील दहा वर्षे होणार की नाही, याविषयी माहिती मिळते. बर्‍याचदा या कर्करोगाची लक्षणे दिसून येत नाही; परंतु इतर काही लक्षणांमध्ये रक्‍तस्राव होणे, पांढर्‍या रंगाचं पाणी जाणे, संबंधानंतर ओटीपोटात दुखणे या समस्या उद्भवतात. जर हा कर्करोग बळावला असेल तर त्यावेळी भूक न लागणे, वजन कमी होणे कंबर, पाय तसेच ओटीपोट दुखणे या तक्रारी येतात.

गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची कारणे ः

ह्युमन पेपिलोमा व्हायरस : हा व्हायरस अतिशय धोकादायक असून हा अत्यंत वेगाने वाढतो. या विषाणूमुळे होणार्‍या आजाराची लक्षणे अनेक वेळा दिसून येत नाहीत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या विषाणूपैकी एचपीव्ही-16 आणि एचपीव्ही-18 हे विषाणू अत्यंत घातक आहेत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी हे विषाणू प्रामुख्याने कारणीभूत ठरतात.

रोगप्रतिकारकशक्‍ती : ज्या महिलांमध्ये रोगप्रतिकारकशक्‍ती कमी असते त्यांना या कर्करोगाचा जास्त धोका असतो. एचआयव्हीसारखा धोका ह्युमन पेपिलोमा विषाणूला सहायक ठरतो.

असुरक्षित लैंगिक संबंध : अधिक पुरुषांशी असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यार्‍या महिलांना या कर्करोगाचा सर्वात जास्त धोका असतो. शारीरिक संबंध ठेवताना निरोधाचा वापर केल्यास कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

धोका ः

खालील वयोगटात या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. 

* कमी वयात लग्‍न होणे/लैंगिक संबंध (विशेषत: 16 व्या वर्षाआधी)

* अनेक जणांसोबत संबंध

* कमी वयात पहिले मूल होणे (विशेषत: 17 व्या वर्षाआधी)

* अनेक गर्भधारणा (पाच किंवा त्याहून अधिक)

* धूम्रपान

* विविध प्रकारच्या संतती नियमनाच्या गोळ्या घेणे (कर्करोगाच्या पार्श्‍वभूमीत-बर्‍याचदा जीवनपद्धतीशी निगडित कारणांमुळे-काहीशी भर पडते)

* पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वांची कमतरता

* गुप्तांगांची योग्य स्वच्छता न ठेवणे

उपचार

* या कर्करोगाच्या प्रथम टप्प्यात छोट्या शस्त्रक्रिया केल्या जातात.

* परिस्थितीनुसार गर्भाशय काढून टाकणे अथवा योनीमार्गाचा वरचा भाग काढण्यात येतो.

* शस्त्रक्रिया टाळून रेडिओथेरेपीचा वापर केला जातो.

गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी खालील गोष्टी करून प्रतिबंध करणे शक्य आहे.

* एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन यांचे मिश्रण घेतल्याने हा धोका कमी होऊ शकतो.

* निरोगी वजन ठेवा.

* व्यायाम करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news