’IVF/ ICSI ’ करताना… | पुढारी

डॉ. प्रवीण हेंद्रे

IVF/ ICSI करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या खर्चाचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचे असते. IVF Centre ने सांगितलेला खर्च हा या उपचारापुरता असतो. म्हणजे त्याला लागणार्‍या प्रयोगशाळेचा खर्च Clinician ची फी Embryologist ची फी, वापरावी लागणारी रसायने Media, folicle Monitoring ovumpickup  व त्यासाठी द्यावी लागणारी भूल व Embryo-transfer पर्यंतचा असतो म्हणजे स्त्री बीजांडाची वाढ पाहून स्त्रीबीज संकलित करणे. त्याचे IVF/ ICSI करून गर्भ म्हणजेच भ्रूण तयार करणे व त्याचे गर्भाशयात रोपण करण्यापर्यंत सांगितला जातो. काही IVF Centers हार्मोन्स सप्रेरकांचा खर्च ज्या त्या प्रणाली व पेशंटप्रमाणे वेगळा सांगतात. परंतु, गर्भाशयाची लायनिंग (Endometrium) तयार करावयाचा व प्रोजेस्टेरॉन सपोर्टचा तर काही पेशंटमध्ये Heparin HCG, तसेच इतर गर्भास सपोर्ट करणार्‍या औषधांचा यात अंतर्भाव नसतो. तसेच एक गोष्ट खरोखर सर्वांनी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे, ती म्हणजे  IVF/ ICSI मधून तयार होणारे गर्भ थोडेसे नाजूक असतात व पहिल्या तीन महिन्यांत रक्तस्राव, पोटदुखी होऊ शकते. तेव्हा त्याच्या उपचारांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो व त्यातच तिळे, चौळे किंवा पंचाळे गर्भ असले, तर ते Foetal Reduction करावे लागले, तर तो वेगळा खर्च होऊ शकतो.

सर्वात गंभीर गुंतागुंत म्हणजे Ovarian Hyper Stimulation Syndrome (OHSS) यामध्ये काहीवेळेस जीवघेणा त्रास होऊ शकतो.

स्त्रीबीजे कृत्रिमरीत्या जास्तीची मिळण्यासाठी काही स्त्री संप्रेरके वापरावी लागतात. त्याचा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा प्रतिसाद (Responce) मिळतो. तो मुख्यत्वे तीन प्रकारात मोडतो. 1) Poor Responder, 2) Normal Responder, 3) Hyper Responder

Poor Responder मध्ये स्त्री बीज संख्या खूपच कमी असते. त्यांच्यामध्ये  AMH चे प्रमाण तसेच AFC चे प्रमाण कमी असते.

छेीारश्र ठशीिेपवशी मध्ये सर्वसाधारण प्रतिसाद मिळतो व AMH/ AFC नॉर्मल असते. परंतु, Hyper Responder शक्यतो PCOS मध्ये आढळते, त्यास AFC व AMH चे प्रमाण वाढलेले असते आणि अशा स्त्रियांमध्ये OHSS ची शक्यता दाट असते.

IVF/ ICSI चा वापर करण्यासाठी Normal Responder सर्वात चांगले असतात. त्यामध्ये स्त्रीबीजे जेवढी हवी तेवढी मिळतात. गर्भधारणेचे प्रमाणही चांगले असते. टेस्ट ट्यूब बेबी प्रणालीची सुरुवात झाली, तेव्हा अनेक स्त्रीबीजे तयार करून चार ते पाच गर्भ तयार करीत, तेव्हा गर्भ गोठवण्याची प्रक्रिया इतकी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे तयार झालेले सर्व चांगले गर्भ हे गर्भाशयात प्रत्यारोपित करीत असत. पण त्यातून तिळे, चौळे, पंचाळ असे 3, 4, 5 गर्भ गर्भाशयात तयार होत असत व त्यामुळे अशा गरोदरपणात अपुर्‍या कालावधीमध्ये गर्भपात किंवा बाळंतपण होण्याचा संभव दाट असे. तसेच इतक्या प्रमाणात गर्भाशयात गर्भ रुजल्यानंतर High Blood Pressure चा विकार जडण्याचे शक्यता वाढत असते.

म्हणून आज एकच गर्भ प्रत्यारोपित करण्याची प्रथा प्रचलित होताना दिसत आहे. परंतु, अशावेळेस गर्भधारणा कमी प्रमाणात होण्याचा संभव असतो व नाहक अनेक Cycles कराव्या लागत असल्यामुळे थोडा खर्चिक प्रकार होतो. तेव्हा आता ICMR नी तीनपेक्षा जास्त Zygote  (भ्रूण) गर्भाशयात प्रत्यारोपित करायचे नाहीत, असा कायदा केला आहे.

AMH/AFC स्त्रीचे वय, वजन यावरून कोणते संप्रेरक व कोणत्या प्रमाणात वापरायचे हे ठरते व सर्वप्रथम कोणती प्रणाली वापरायची हे ठरविले जाते. Down Regulation म्हणजे संप्रेरकांना प्रथम दडपून मग बाहेरून स्त्री संप्रेरके देऊन स्त्री बीज निर्मिती करणे किंवा Short Protocol, Long Protocol, Ultra Short Protocol अशा अनेक प्रकारांपैकी एक प्रकारचा Protocol  ठरविला जातो. पण, आताच्या घडीला बहुतेक स्त्रियांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेला Antagonist Protocol वापरून स्त्री बीज निर्मिती केली जाते.

आता कमी खर्चासाठी IVF/ ICSI  साठी अगदी नैसर्गिक पाळीदरम्यान तयार होणारे एकमेव अंडे घेऊन गर्भधारणा करण्याची प्रथा प्रचलित होत आहे.

तर सर्वप्रथम मासिक पाळीच्या दुसर्‍या दिवशी या संप्रेरकाची विशिष्ट मात्रेमध्ये कातडीखाली इंजेक्शन सुरू करतात. ही दिवसाच्या ठराविक वेळीच घ्यावी लागतात. त्यामुळे अगदी चांगल्याप्रकारे स्त्री बीजे मिळतात. तसेच दर तीन ते चार दिवसांनी सोनोग्राफीद्वारे गर्भाशयाच्या लायनिंगची वाढ व गुणवत्ता तपासणी केली जाते, तसेच स्त्री बीजाच्या वाढीवर लक्ष ठेवले जाते व 13 ते 14 मि.मी. चे झाले, की संप्रेरकाबरोबरच Antagonist चे इंजेक्शन सुरू करतात. ही Antagonist ची मात्रा स्त्री बीजांना फुटू देत नाही व जी स्त्री बीजे वाढीच्या प्रमाणात मागे पडली आहेत, ती 18 मि.मी. इतकी झाली की, Rupture म्हणजे स्त्री बीजे परिपक्व होण्याचे इंजेक्शन (HCG) दिले जाते व त्यानंतर 34 तासांनी स्त्री बीज संकलन करतात व ही स्त्री बीजे GR, M I, M II मध्ये  वर्गवारी केली जाते. गर्भधारणा होण्यासाठी M2 चीच स्त्री बीजे आवश्यक असतात. ही स्त्री बीज संकलनानंतर Denudation  करून सर्व स्त्री बीज थोडा वेळ म्हणजे दोन ते तीन तास कालावधीपुरते Incubator  उबवणी यंत्रात ठेवली जाते व परिपक्व झाले की त्यावर IVF किंवा ICSI ची प्रक्रिया केली जाते. ती आपण पुढील लेखात पाहू.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news