कोरोना आता मुख्यमंत्र्यांच्या दारात; ‘मातोश्री’च्या बाजूचा चहा वाला कोरोना पोजिटिव्ह

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'च्या आसपासचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. 'मातोश्री' पासून अगदी काही मीटर वर असलेला एक चहा विक्रेताच कोरोना पोजिटिव्ह असल्याचे समोर आल्याने आता मोठी चिंता वाढली आहे. कारण मातोश्रीच्या कलानगर विभागातील सर्व रहिवासी ज्या ठिकाणी गाडी पार्क करतात, ज्यात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील देखील गाड्या पार्किंगला असतात. त्याच ठिकाणी हा चहावाला चहा विक्री करतो. त्याच्याकडे मातोश्री वर पहारा देणारे अनेक पोलिस कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा रक्षक चहा पिण्यास देखील जात होते. याला लागूनच पोलिसांनी मातोश्री वरील सुरक्षेसाठी असलेली चौकी देखील उभारली आहे.

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात 'मातोश्री' हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे. 'मातोश्री'जवळील या चहा विक्रेत्याला प्रकृतीचा त्रास जाणवत होता, मात्र पालिकेने त्याची कोरोना चाचणी केल्यावर तो पोजिटिव्ह आल्याने यंत्रणा आणि विभागीय रहिवाशी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून पालिकेतर्फे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीरण प्रक्रिया करण्यात येत आहे. कलानगर हा 'एच पूर्व' विभागामध्ये मोडतो. ५ एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभागात देखील आता चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news