बारामतीत कोरोनाचा सापडला दुसरा रुग्ण 

बारामती : पुढारी वृत्तसेवा 

शहरातील श्रीरामनगर भागात कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णाची प्रकृती सुधारत असतानाच बारामतीकरांसाठी आणखी एक चिंतेची बाब समोर आली आहे. शहरातील समर्थनगर भागातील एका वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी (दि. ६) रात्री स्पष्ट झाले. बारामतीतील कोरोना संक्रमित हा दुसरा रुग्ण आहे. 

पोलिसांनी बदडले तर काय चुकले? 'नानां'चा संतप्त सवाल

शहरातील एका ४० वर्षीय रिक्षा चालकाला कोरोना झाल्याचे ३० मार्च रोजी स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने शहरातील श्रीरामनगर भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला होता. या रुग्णाने बारामतीत दोन रुग्णालयांध्ये उपचार घेतले होते. त्याच्या कुटुंबातील आठ जणांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली होती. त्यानंतर हायरिस्कमधील सातजणांचे टेस्टही  निगेटीव्ह आली होती. शहरातील ८२ जणांचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले होते. शिवाय पहिल्या कोरोनाबाधिताची प्रकृती झपाट्याने सुधारत होती. त्यामुळे  बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला असतानाच सोमवारी रात्री हाती आलेल्या बातमीने बारामतीकरांची चिंता वाढली आहे. 

ड्यूटीनंतर घरी आल्यावर थेट बाथरूमध्ये

बारामतीत लॉकडाऊनची अत्यंत कडक अमलबजावणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णाची संख्या एकने वाढली. त्यामुळे यापुढील काळात आणखी कडक उपाययोजना गरजेच्या बनल्या आहेत. समर्थनगर भागातील रहिवाशी कोरोना संक्रमित झाला आहे. तो भाजी विक्रेता आहे. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आलेला असावा अशी शक्यता आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये. 

सदरची परिस्थिती लक्षात घेता समर्थ नगर हे केंद्र धरुन ३ किमी परिसरात प्रतिबंधित झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करणेत येणार आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत येत आहे. अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था केली आहे. तेथून वाहने तपासणी करुनच सोडली जातील. या भागात आरोग्य विभागामार्फत सर्व्हे करणेत आहे. 

– दादासाहेब कांबळे,  प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर बारामती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news