पुण्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू | पुढारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यात कोरोनाबाधित तिघा नागरिकांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिघे रुग्ण वय वर्ष ६० च्या पुढील असल्याची माहिती मिळते आहे. तीन मृतांपैकी दोघा रुग्णांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. 

वाचा :पुण्यातील कोंढव्यासह पेठांचा भाग सील

दरम्यान, आतापर्यंत देशात ४ हजार ४२१ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासात ३५४ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच देशात आतापर्यंत देशात ११७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात देशात ८ जणांचा मृत्यू झाल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news