औरंगाबादमध्ये आणखी तिघांना कोरोनाची लागण

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

औरंगाबाद शहरात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीच्या घरातील मोठ्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण झाली आहे. तर जलाल कॉलनी येथील एका १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

वाचा :  औरंगाबाद : घाटीतील पुरुष परिचारकाला कोरोनाची लागण (video)

औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सोमवारपर्यंत ११ वर पोहोचलेला हा आकडा मंगळवारी १४ वर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वीच मराठवाड्यात कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला होता. तो औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील सह्याद्रीनगरात राहत असे. त्यांच्या कुटुंबियातील ८ जणांची तातडीने तपासणी करून स्वॅब घेण्यात आले होते. मंगळवारी त्यांचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये मृताचा मोठा मुलाला आणि लहान मुलाच्या बायकोला कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. 

तसेच जलाल कॉलनी येथील एका १७ वर्षीय तरुणीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाले आहे. या सर्व जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर सर्वांवर एआरटी ट्रीटमेंट सुरू केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा :औरंगाबाद : कुक्कुटपालन व्यवसाय संकटात

logo
Pudhari News
pudhari.news