बारामती : ‘त्या’ कुटुंबातील आणखी दोघे पॉझिटिव्ह

बारामती : पुढारी वृत्तसेवा 

सोमवारी (दि. ६) रोजी बारामतीत कोरोना संसर्ग झालेल्या त्या रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी मिळालेल्या रुग्णाची सून व मुलाला कोरोना झाला आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४ वर पोहोचली आहे. 

अधिक वाचा : पुणे : बड्यांच्या फार्म हाऊससाठी घोटला टेकड्यांचा गळा!

शहरातील समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी रात्री स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रशासनाने गतीमान हालचाली करत त्या कुटुंबातील अन्य बारा जणांना उपचारासाठी औंध रुग्णालयात हलवले होते. त्यांचे स्वॅबचे नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोना बाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बारामतीत रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनापुढील चिंता अधिकच वाढली आहे. 

अधिक वाचा : पुणे : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या 'या' भागात कर्फ्यू

बारामतीत २९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतरचे नऊ दिवस शहरासाठी चांगले गेले. परंतु सोमवारपासून संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बारामतीकरांपुढील संकट अधिकच वाढले आहे.

अधिक वाचा : पुण्यात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news