कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे नवीन १८ रुग्ण

कल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवलीत महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दोनशेच्या वर गेला आहे. सोमवारी सापडलेल्या रुग्णांची संख्या १८ ने वाढल्याने २१३ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. सोमवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये आठ रुग्ण सापडले. यात मुंबईत नवी मुंबई येथे कामाला जाणारे चार पोलिस आहेत. तर शासकीय कार्यालयातील आरोग्‍य कर्मचारी व सफाई कर्मचारी दोन, वाशी एपीएमसी मार्केट मधील कर्मचारी भिवंडीतील फार्मा कंपनीतील कर्मचारी प्रत्येकी एक एक रुग्णाचा समावेश असून, उर्वरित दहा रूग्ण कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासीत आहेत.

वाचा : युपीएससीची ३१ मे रोजीची पूर्वपरीक्षा रद्द; जाणून घ्या कधी जाहीर होणार नवी तारीख

सोमवारी पालिका क्षेत्रात एकूण १८ रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये  मुंबई, नवी मुंबईतील शासकीय कार्यालयात व नवी मुंबई एपीएसी मार्केट, भिवंडीतील फार्माकडे कामाला जाणारे कर्मचारी आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी कार्यालयात कामाला जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४ इतकी झाली आहे. येत्या काही दिवसात शंभराचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कल्याण पश्चिमकडील परिसरातील ३५ वर्षाचा पुरुष हा मुंबई येथील पोलिस कर्मचारी, ३४ वर्षीय पुरुष हा भिवंडी येथील फार्मा कंपनीतील कर्मचारी तर ४२ वर्षाचा पुरुष हा कोरोना बाधित रुग्‍णाचा सहवासित असे तीन रुग्ण तर कल्याण पूर्व कडील परिसरातील ४२ वर्षांचा पुरुष हा वाशी येथील पोलिस कर्मचारी, ३८ वर्षाचा पुरुष मुंबई येथील शासकीय कार्यालयातील सफाई कर्मचारी आहे. तर ३३ वर्षांची महिला कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित असे तीन रुग्ण सापडले.

डोंबिवली पश्चिम परिसरातील ३३ वर्षाचा पुरुष हा मुंबई येथे शासकीय रुग्‍णालयातील आरोग्‍य कर्मचारी तर २६ वर्षांचा पुरुष हा वाशी ए.पी.एम.सी. मार्केट मधील कर्मचारी आहे. डोंबिवली पूर्व परिसरातील २० वर्षांची महिला,२३ वर्षांची महिला, ४३ वर्षांची महिला व ७२ वर्षांची महिला सह २५ वर्षांचा पुरुष असे पाच रुग्ण कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित सापडले आहेत. 

मांडा -टिटवाळा परिसरातील २९ वर्षांची महिला ही  मुंबई येथील पोलिस कर्मचारी व  २६ वर्षांची महिला (मांडा टिटवाळा )- कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित रुग्ण असून, तर  ३५ वर्षांचा पुरुष हा  मुंबई येथील पोलिस कर्मचारी आहे.  २१ वर्षांचा पुरुष व ५८ वर्षांचा पुरुष कोरोना बाधित रूग्‍णाचा सहवासित रुग्ण तीन असे पाच रुग्ण सापडले आहेत. सोमवारी सापडलेल्या रुग्णाला मध्ये कल्याण पूर्व – पश्चिम प्रत्येकी -३, डोंबिवली डोंबिवली पूर्व-४,डोंबिवली पश्चिम -२, मांडा- टिटवाळा – ५ असे अठरा रुग्ण सापडले आहेत. पालिका क्षेत्रात आता एकूण २१३ कोरोना बाधित रुग्णाची संख्या झाली असून, गेल्या २४ तासात नव्याने दीड वर्षाच्या चिमुकलीसह ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण ६८ रुग्ण उपचारा अंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३ मयत झाले असून १४२ जणांवर डोंबिवली मुंबई ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण पूर्व ४२, कल्याण पश्चिम ३३, डोंबिवली पूर्व ६८, डोंबिवली पश्चिम ४८, मांडा टिटवाळा १४, मोहने ७, पिसवली १ असे एकूण २१३ रुग्ण आहेत .

वाचा : पुण्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी हॉस्टेलचा ताबा घेण्याचे हायकोर्टाचे आदेश  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news