मीरा-भाईंदरमध्ये १० नवीन कोरोना रुग्ण 

भाईंदर : पुढारी वृत्तसेवा

मीरा-भाईंदर शहरात गेल्या २४ तासांत १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले तर २ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यातील एक कोरोनाग्रस्त रविवारी तर एक  कोरोना संशयित रुग्ण सोमवारी दगावल्याचे सांगण्यात आले.

रविवारी दगावलेला कोरोनाग्रस्त भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत राहणारा होता. तो डायलिसिसचा रुग्ण असल्याने त्याच्यावर मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृत्यूनंतर रुग्णालयाने त्याचा मृतदेह नातेवाईकांना दिला. त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भाईंदरच्या स्मशानात मध्यरात्रीच्या सुमारास आणला असता त्याच्या अंत्यसंस्काराला तेथील कर्मचाऱ्याने नकार दिला. यामुळे तेथील रहिवाशांनी स्मशानभूमी परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळी भाईंदर पोलिसांनी धाव घेत कारवाईला सुरुवात करताच तणाव निवळला. दरम्यान, तो मृतदेह जोशी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाईंदर पश्चिमेकडील खारीगाव परिसरात राहणारा एक कोरोना संशियित रुग्णाचा सोमवारी जोशी रुग्णालयात मृत्यू झाला. तर गेल्या २४ तासांत १० जणांना  कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून त्यातील ८ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असून त्यातील प्रत्येकी एक रुग्ण भाईंदर पश्चिमेकडील ठाकूर गल्ली व मोदी पटेल रोड तर उर्वरित ६ रुग्ण भाईंदर पूर्वेकडील विविध ठिकाणी राहणारे आहेत. तर २ जणांना अगोदरच्या कोरोग्रस्तांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली असून ते अनुक्रमे भाईंदर पूर्व व मीरारोड येथे राहणारे आहेत.

सध्याच्या ७७ कोरोनाग्रस्तांपैकी २ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून उर्वरित ७५ कोरोनाग्रस्तांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news