कोल्हापूर : चार वर्षीय बालकाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह

इचलकरंजी : पुढारी वृतसेवा

इचलकरंजी येथील नदीवेस नाका परिसरात कोरोनाचा तिसरा रुग्ण सापडल्याने इचलकरंजीवासियांनी चांगलाच धसका घेतला होता. मात्र कोरोनाचा दुसरा रुग्ण ठरलेल्या चार वर्षीय बालकाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाचा :विशेष संपादकीय : जनतेने साथ द्यावी

कोले मळा येथील वृध्दाला कोरोनाची लागण झाली. इचलकरंजी शहरातील तो कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांचे अहवालही तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दुर्दैवाने या रुग्णाच्या चार वर्षीय नातवाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे इचलकरंजीतील तो कोरोनाचा दुसरा रुग्ण ठरला. दरम्यान उपचार सुरू असताना त्या वृध्दाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा तो पहिला बळी ठरला. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

वृध्दाच्या मृत्यूनंतर चार वर्षाच्या त्याच्या नातवाचा दुसरा अहवाल काय येतो याकडे शहरवासियांचे लक्ष लागले होते. इंदिरा गांधी इस्पितळातून त्याचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तो निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनासह शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बालकावर इंदिरा गांधी इस्पितळातील अधीक्षक डॉ.रविंद्र शेट्ये, डॉ.संदीप मिरजकर, डॉ.श्रीकांत सूर्यवंशी यांनी यशस्वीरित्या उपचार केले.

कोरोनामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून बालक इस्पितळात उपचार घेत होते. त्यामुळे कुटुंबापासून तो दूर होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आता त्याच्या घरी जाण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. 

वाचा :कोल्हापूरला दिलासा! 'त्या' तिघांचे अहवाल निगेटीव्ह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news