पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले कोरोनाचे ९ नवे रूग्ण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि.५) कोरोनाबाधित तब्बल ९ रूग्ण आढळले. त्यात दीड महिन्यांची बालिका, ४ व ११ वर्षाच्या बालकांपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या १४२ वर पोहोचली आहे. त्यातील एकूण १० रूग्ण पुणे शहरातील आहेत.

वाचा :  मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांचे निधन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दुपारपर्यंतच्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, सांगवी या परिसरातील ८ रूग्ण आहेत. त्यात ४, ११, २२, ३९,६१, ७४ वर्षांचे पुरूष व दीड महिन्यांची बालिका व ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर, पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. 

पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात ६३ जणांवर उपचार सुरू असून, त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर, ११ जण पुण्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ५५ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ५ जणांचा मृत्यू झाला आहे. 

वाचा :बारामतीत आणखी एकाला कोरोना, ऑरेंज झोनमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news