ठाणे : सहा महिन्यांचा बालकासह ९० वर्षांच्या आजीने केली कोरोनावर मात 

ठाणे : पुढारी वृत्तसेवा 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला असून तब्बल १ हजार ३०० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांनी रुग्ण बरे होण्याची संख्याही दिलासादायक आहे. जवळपास २९० रुग्ण बरे झाले आहेत. त्यात आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात १६ नव्या रुग्णांची  भर पडली. ९० वर्षीय आजीने कोरोनावर विजय मिळवत घर गाठले आहे. एवढेच नाही तर सहा महिन्याच्या बालकासह पाच वर्षाखालील तीन बालकांचा समावेश आहे. या सर्वांचे रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी गाणी आणि टाळ्या वाजवून निरोप दिला. 

अधिक वाचा : दुकाने उघडली अन् एका दिवसात मद्यपींनी ढोसली २४ लाख लिटर दारु!

रेड झोनमध्ये असलेल्या ठाणे जिल्ह्यात दररोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. तब्बल १३०० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाने झोपडपट्टीमध्ये शिरकाव केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास अडचणी येत आहेत. सुमारे ३३ जणांचे या महामारीने प्राण घेतले आहेत. असे भयावह चित्र असताना दिलासादायक घटनाही घडत आहेत. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवकांच्या प्रयत्नामुळे २९० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर विजय मिळवत रुग्णांनी इतर रुग्णांना आशेचे किरण दाखविले आहे. असेच तब्बल १६ रुग्ण आज ठाणे सिव्हिल रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व अन्य डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवकांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत टाळ्यांच्या गजरात त्यांची घरी रवानगी केली. हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन हे गीत गाऊन त्यांना प्रोत्साहन दिले . 

अधिक वाचा : लॉकडाऊन-३ मध्ये होणार कोरोना रूग्णसंख्येच्या वाढीत घट!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news