यवतमाळात कोरोना रूग्ण वाढीचा वेग मंदावला

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ जिल्ह्यातील गत आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढलेला वेग या आठवड्यात मंदावला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ८१ असून, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १३३ जण भरती आहेत. यात ५२ प्रिझमेटिव्ह केसेस असून गत २४ तासात दोन रुग्ण भरती झाले आहेत.

अधिक वाचा : यवतमाळात सापडली बिबट्याची कातडी

सुरुवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता १२१२ नमुने वैद्यकीय महाविद्यालयाने पाठविले आहे. यापैकी १२०० प्राप्त तर १२ अप्राप्त आहेत. प्राप्त नमुन्यांपैकी आतापर्यंत ११०९ नमुने निगेटिव्ह आल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात १०९ तर गृह विलगीकरणात एकूण १११८ जण आहेत. 

अधिक वाचा : अकोल्यात कोरोनाचे ११ नवे रूग्ण

लॉकडाऊनचा तिसरा टप्पा कालपासून सुरू झाला आहे. हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यात जिल्ह्यातील नागरिकांनी ज्याप्रकारे सहकार्य केले, तसेच सहकार्य आताही करावे. अटी आणि शर्तीच्या अधीन राहून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू केली आहे. ठराविक वेळेत ही दुकाने सुरू असून खरेदीकरीता नागरिकांनी गर्दी करू नये. तसेच बाहेर निघताना मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

अधिक वाचा : अमरावतीत कोरोनाची झपाट्याने वाढ, १० नवे पॉझिटिव्ह सापडले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news