कल्याण- डोंबिवलीत कोरोनाचे ११ नवे रुग्ण; बाधितांमध्ये ४ पोलिसांचा समावेश

कल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज पुन्हा नव्याने ११ रुग्णांची भर पडल्याने पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या २२४ वर पोहोचली आहे. तर मागील२४ तासांत ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने आजमितीला एकूण ७४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीत पुन्हा ११ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या २२४ वर पोहोचली आहे. कल्याण पूर्व येथे आढळलेले २२, ३२ आणि ४२ वर्षीय या तिन्ही महिला तसेच ३२ वर्षीय पुरुष असे चौघे मुंबई येथील पोलिस कर्मचारी आहेत. तर ३८ वर्षीय पुरुष हा मुंबई येथील खासगी रुग्णालयातील फार्मासिस्ट, २६ वर्षीय महिला कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित आहे. डोंबिवली पश्चिमेकडील २२ वर्षीय महिला मुंबई येथील खासगी रुग्णालयात स्टाफ नर्स, ३५ वर्षीय पुरुष ए.पी.एम.सी. मार्केट मधील कर्मचारी आहे. डोंबिवली पूर्वेकडील ३३ वर्षीय पुरुष ए.पी.एम.सी. मार्केटमधील कर्मचारी आहे तर मांडा टिटवाळा येथे आढळलेला ५५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णांचा सहवासित, कल्याण पश्चिम येथे आढळलेली ४४ वर्षीय महिलाकल्याण येथील खासगी क्लासेसमधील कर्मचारी आहे.

गेल्या २४ तासांत ६ जणांना डिस्चार्ज दिला असून एकूण ७४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून १४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news