सतत उचकी येतेय? | पुढारी | पुढारी

सतत उचकी येतेय? | पुढारी

डॉ. मनोज शिंगाडे

आपल्याला सतत उचकी येत असेल किंवा उचकीसारखा अनुभव येत असेल, तर ती बाब साधारण समजू नका. हा एक प्रकारचा आजार असून तो लाखो लोकांत एकाला होऊ शकतो. या आजाराला टोरेट सिंड्रोम असे म्हणतात. या आजारात शरीरातील टोरेट सिस्टिमवर परिणाम होतो. यात व्यक्तीला अचानक उचक्या येऊ लागतात आणि ही क्रिया सतत होत राहते. अनेकदा थोडी, तर काही वेळा खूप उचक्या येतात. सतत येणार्‍या उचक्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. 

टोरेट हा एक प्रकारे मेंदूशी निगडीत आजार आहे. यात कोणत्याही व्यक्तीला म्हणजे लहान-मोठ्यांना उचकी येऊ शकते. हा आजार दोन प्रकारे  होतो. एक तर पर्यावरणाच्या कारणामुळे किंवा जनेटिक कारणाने. बहुतांश वेळा हा आजार वयाच्या 18 व्या वर्षाच्या आतील व्यक्तीवर हल्ला करतो. या आजारातील आणखी एक बाब म्हणजे या आजाराचे प्रमाण पुरुषात अधिक आढळून येते. तो आजार आयुष्यभर राहतो. 

आजाराचे लक्षणे : या आजाराचे प्रमुख लक्षण हे उचकी आहे. ती कधीही आणि केव्हाही येऊ शकते. त्याचा आवाजही मोठा राहू शकतो. त्यामुळे अशा लोकांना चारचौघांत काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या आजाराला दोन भागांत विभागणी करता येते.  

सिंपल टिक्स : या प्रकारच्या टिक्समध्ये थोड्या कालावधीसाठी उचक्या येतात. यात आवाज कमी असतो. कधी डोके, खांदा किंवा मानेवर ताण पडतो. या आजारात शरीरात अचानक हालचाली होऊ लागतात. 

कॉम्प्लेक्स टिक्स : या प्रकारच्या आजारात सतत उचकी येऊ लागते आणि त्यामुळे अनेकदा चेहर्‍यावरचे हावभावदेखील बदलतात. लकव्याचा त्रास झाल्यानंतर चेहर्‍यात ज्याप्रमाणे बदल होतो, तसा अनुभव या प्रकारातही येतो. त्याचबरोबर उचकीचा आवाजही खूप असतो. अनेकदा उचकीमुळे मानसिक ताण वाढतो आणि रात्रीच्या वेळी ही उचकी खूपच त्रासदायक ठरू शकते. यापासून बचाव करण्यासाठी ध्यानधारणा हा एक उपयुक्त उपाय आहे. 

आजाराचे कारण :  आतापर्यंत या आजाराच्या अचूक कारणांचा शोध लागलेला नाही. अर्थात, बहुतांश प्रकरणात हा आजार अनुवंशिकतेने झालेले आढळून आले आहेत; मात्र याचा अर्थ असा नाही की, आपल्याला आजार असेल, तर आपल्या पाल्यासही होईल. संशोधनातून केवळ पाच ते 15 टक्क्यांच्या बाबतीत अनुवंशिकता आढळून आली आहे. 

निदान कसे करावे? :  एक वर्षापर्यंत एखाद्या व्यक्तीला सतत उचक्या येत असतील, तर त्याला आजार आहे, असे समजायला हवे. अर्थात रक्ताची तपासणी केल्याने किंवा प्रयोगशाळेतील तपासणीतून या आजाराचे निदान होत नाही. परंतु, एमआरआय, क्प्यूटर टेपोग्राफी आदी दुर्मीळ चाचणीतून निदान होऊ शकते. 

उपचार काय? : दुर्दैवाने उचकीच्या आजारावर आतापर्यंत परिणामकारक उपचाराचा शोध लागलेला नाही. त्याची लक्षणेही संपवता आलेली नाही. आजारापोटी घेण्यात येणार्‍या औषधांचे दुष्परिणाम मात्र काही अंशी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पुन्हा औषधे घ्यावी लागतात आणि ते दिलासादायक आहे. या औषधांमुळे अनेकदा वजन वाढते आणि आळशीपणा बळावतो.

उपचारांत अडचणी : उचकीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी आरोग्याविषयी अन्य कोणत्याही तक्रारी राहत नाहीत. परंतु, सतत उचकी येत असल्याने सामाजिक रूपाने वावरताना अडचणींचा सामना करावा लागतो. ज्यांना या आजाराचा त्रास आहे, त्यांनी कोणत्या ना कोणत्या विशेषत: आवडीच्या कामात व्यग्र राहणे गरजेचे आहे. मग, स्पोर्टस् असो किंवा संगीत असो. अशा प्रकारचे छंद किंवा काम ही उचकीची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. संबंधित व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून तो चारचौघात वावरताना अवघडल्यासारखा राहणार नाही. 

उचकीला दाबता येत नाही. परंतु, अनेक प्रकारे उचकीला ऊर्जा आणि दबावाच्या मदतीने त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते. ज्याप्रमाणे आपण शिंक काही प्रमाणात रोखू शकतो, त्याच धर्तीवर उचकीदेखील रोखू शकतो का, याचे संशोधन केले गेले. ही बाब व्यक्तीसापेक्ष राहू शकते. उचकी दाबताना त्रास बळावू शकतो.

 

Back to top button