भारतामध्ये दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती हायपोथायरॉइडिझम आणि अ‍ॅनिमियाने ग्रस्त

Anemia News | स्त्रियांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण ५३ वरून ५७ टक्‍क पोहोचले
भारतामध्ये  दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती हायपोथायरॉइडिझम आणि अ‍ॅनिमियाने ग्रस्त
भारतामध्ये दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती हायपोथायरॉइडिझम आणि अ‍ॅनिमियाने ग्रस्त
Published on
Updated on

मुंबई: भारतामध्ये ४.२ कोटी लोकांना थायरॉइडचा त्रास आहे, हायपरथायरॉईडिझमग्रस्त व्यक्तींपैकी ४१.८ टक्‍के व्यक्ती या बरेचदा हायपरथायरॉइडिझमचे पहिले लक्षण असणाऱ्या अ‍ॅनिमियाने प्रभावित असल्याचे दिसते. रक्तातील तांबड्या पेशींची संख्या सर्वसामान्य आकड्यापेक्षा कमी भरणे हे व्यवच्छेदक लक्षण असणारा अ‍ॅनिमिया बरेचदा हायपोथायरॉइडिझमच्या सोबत शरीरात वास्तव्यास येतो. हायपोथायरॉइडिझममध्ये तुमच्या मानेमध्ये स्थित फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड संप्रेरके निर्माण करू शकत नाही. ही संप्रेरके अत्यंत महत्त्वाची असतात.

हिवाळ्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी व तापमान नियमित करण्यासाठी शरीराकडून जादा थायरॉइड संप्रेरकांची मागणी केली जाते. ज्यामुळे वजन वाढणे, थकवा, नैराश्य, कोरडी आणि खरबरीत त्वचा व केस, थंडी सहन करणे कठीण जाणे व हातांमध्ये झिणझिण्या येणे यांसारखी सर्वसामान्य लक्षणे अधिकच तीव्रतेने जाणवू शकतात. स्त्रियांना हायपरथायरॉइझमची शक्यता पुरुषांच्या तुलनेत तीन पट असते. वयोवृद्ध माणसे हा लोकसंख्यागटात या स्थितीचा विशेषत्वाने प्रादुर्भाव असल्याचे आढळते.

'हे' दोन आजार एकमेकांशी कशाप्रकारे जोडलेले आहेत?

थायरॉइडची पातळी खाली गेली की तांबड्या रक्तपेशी बनण्याची प्रक्रिया मंदावते. हायपोथायरॉइडिझम किंवा होशिमोटोज थायरॉयडायटिससारख्या थायरॉइड आजारांच्या परिणामी ही प्रक्रिया अधिकच गुंतागूंतीची बनते. या स्थितींच्या परिणामी बरेचदा बी१२ या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळेही तांबड्या रक्तपेशी बनण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यात थायरॉइडच्या खालावलेल्या पातळीचा लोह खनिज रक्तात शोषल्या जाणाऱ्या क्रियेत हस्तक्षेप होतो. ज्यातून चयापचयाशी निगडित विविध प्रक्रियांमध्ये व्यत्यय येतो. दोन्ही समस्यांपैकी कोणत्याही एका समस्येवर उपचार न झाल्यास हे प्रश्न अधिकच गंभीर बनू शकतात आणि त्यातून या स्थितीचे व्यवस्थापन अधिकच कठीण बनू शकते.

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, “हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या भारतातील लक्षणीय आरोग्यसमस्या आहेत. मात्र वेळेवर निदान व सातत्यपूर्ण उपचार यांच्या मदतीने त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य आहे. अधिकाधिक लोकांना या दोन स्थितींमधील संबंधाविषयी शिक्षित करणे व लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तत्परतेने वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रोत्साहित करणे हा या समस्येवरील महत्वाचा उपाय आहे. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अगदी उन्हाळ्यातही थंडी वाजत असेल किंवा एखादा मित्र-मैत्रिण कधी न जाणाऱ्या थकव्याची तक्रार करत असेल तर त्यांना डॉक्टरकडे जाण्यासाठी आणि तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्या.”

या मुद्द्यामध्ये भर टाकत करुणा हॉस्पिटल, भक्तीवेदांत हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अमेय जोशी म्हणाले, “आज, हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या दोन्ही आजारांचा ताण वाढत आहे. उदाहरणार्थ, १५ ते ४९ वर्षे वयोगटीत स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ५३ टक्‍के होते, ते वाढून २०१९-२०२१ मध्ये ५७ टक्‍के झाले आहे. लोकांनी या दोन स्थितींमधील नाते समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे निदानास मदत होईल व सुयोग्य सल्ला व उपचारांची हमी मिळू शकेल.”

कोणी आणि का चाचणी करावी

• स्त्रिया (विशेषत: गरोदर स्त्रिया)

• वयोवृद्ध व्यक्ती

• ऑटोइम्युन आजार (सेलिअॅक किंवा क्रॉह्नस डिजिजसारखे) असलेल्या व्यक्ती

• पोषणाची कमतरता असलेल्या व्यक्ती (बी१२ ते डी यासारखी अनेक जीवनसत्त्वे, लोह व इतर पोषक घटक)

• दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती (जसे की मधुमेह, क्रॉनिक किडनी डिजिज व यकृताचा आजार)

• दीर्घकाळापासून असेलली अॅसिडीटी आणि पचनाच्या समस्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news