

सौंदर्याचे, निसर्गाचे खरे रसिक आपणच असता. आपली सौंदर्याची अभिरुची ही अभिजात असते. एखाद्या गाण्याचे, काव्याचे, चित्राचे व शिल्पाचे रसग्रहण आपणच करू शकता. केवळ पैसा व संपत्ती हे आपले ध्येय असत नाही. सुंंदर वृक्षराजी, निळे-हिरवे डोंगर, विस्तीर्ण जलाशय, सरोवरे, अथांग सागर, आकाशाचे विविध रंग, विस्तीर्ण बागा, मोराचे नृत्य, मधुर संगीत यामुळे वेडे होणारे व त्यात रसिकतेने आकंठ बुडणार्या व्यक्ती म्हणजे तुळा व्यक्ती होत. जीवनातील, काव्यातील, निसर्गातील, साहित्यातील सौंदर्य आपण रसिकतेने टिपता.
आरोग्याच्या द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. सामान्यत: तुळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्यही चांगले असते. दि. 14/05/2025 पासून ते दि. 31/12/2025 पर्यंत आरोग्य निश्चित चांगले राहणार आहे.
आरोग्य द़ृष्टीने चांगले कालखंड.
दि. 01/06/2025 ते दि. 28/06/2025
दि. 14/09/2025 ते दि. 08/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 31/12/2025
व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योगधंदा आर्थिक लाभ या द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने हे वर्ष अनुकूल आहे. विशेषत:
दि. 14/05/2025 ते दि. 31/12/2025 हा कालखंड विशेष चांगला आहे. हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींना ट्रान्स्पोर्ट, सर्व्हिस स्टेशन, प्रॉपर्टी, वाहने, कापड, ज्वेलरी, फोटोग्राफी, टुरिझम, साहित्य, लेखन, वृत्तपत्र, कायदा, प्रसारमाध्यमे, अभिनय, हॉटेल, रेस्टॉरंट, फूड प्रॉडक्टस् या द़ृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड.
दि. 01/01/2025 ते दि. 27/01/2025
दि. 01/06/2025 ते दि. 29/06/2025
दि. 14/09/2025 ते दि. 08/10/2025
दि. 10/11/2025 ते दि. 20/12/2025
नोकरीतील तूळ राशीच्या व्यक्तींना दि. 14/05/2025 पासूनचा कालखंड अनुकूल आहे. या वर्षी नोकरीत बढतीचे योग आहेत. बदली हवी असेल तर मिळण्याचे योग आहेत. पगारवाढीचे योग आहेत. यावर्षी बढती निश्चित मिळेल व पगारवाढही निश्चित मिळेल.
नोकरीत अधिक चांगला कालखंड
दि. 13/04/2025 ते दि. 14/05/2025
दि. 15/06/2025 ते दि. 15/09/2025
दि. 27/10/2025 ते दि. 20/12/2025
प्रॉपर्टी, गुंतवणूक, घर, जागा, बंगला, फ्लॅट, प्लॉट, वाहन खरेदीसाठी तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. तुमचे घराचे स्वप्न साकार होईल यासाठी हे वर्ष अनुकूल आहे.
संततिसौख्य, मुलामुलींची प्रगती, त्यांचे शाळा, कॉलेजमधील प्रवेश व त्यांचे परीक्षेतील यश, त्यांचे नोकरी, व्यवसायातील यश व त्यांची एकूणच प्रगती या द़ृष्टीने दि. 14/05/2025 पासूनचा कालखंड विशेष अनुकूल आहे.
दि. 18/05/2025 नंतरच्या कालखंडात विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. मुलामुलींचे सर्व प्रश्न मार्गी लागतील.
संततिसौख्यासाठी चांगला कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 28/01/2025
दि. 01/06/2025 ते दि. 29/06/2025
दि. 14/09/2025 ते दि. 08/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 31/12/2025
वैवाहिक सौख्य, विवाहेच्छुंचे विवाह यासाठी दि. 14/05/2025 ते दि. 31/12/2025 हा कालखंड चांगला आहे. दि. 01/01/2025 ते दि. 13/05/2025 गुरू आठव्या स्थानात आहे. त्यामुळे या कालखंडात साखरपुडा, विवाह, कोणतेही शुभ कार्य होऊ शकत नाही. तूळ राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींना विवाहासाठी दि. 14/05/2025 ते
दि. 31/12/2025 हा कालखंड अनुकूल आहे.
वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 05/06/2025
दि. 14/09/2025 ते दि. 08/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 31/12/2025
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या द़ृष्टीने वर्ष तुळा राशीच्या व्यक्तींना दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 14/05/2025 नंतरच्या कालखंडात प्रवास सुखकर होतील. तीर्थयात्रेचे योग येतील. परदेश प्रवासाचे योग येतील व प्रवासामुळे काहींची आध्यात्मिक प्रगती होईल तर काहींना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
प्रवासाच्या द़ृष्टीने चांगला कालखंड
दि. 14/09/2025 ते दि. 08/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 31/12/2025
सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश, तसेच कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन, अभिनय, रंगीभूमी, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र, विमा, कायदा, संशोधन, लेखन, प्रकाशन या सर्व द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड अनुकूल आहे. दि. 14/05/2025 नंतर आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला चांगली संधी मिळेल. तुळा राशीच्या व्यक्ती मुळातच साहित्य व संगीत प्रेमी असतात. त्यांच्याकडे विशेष रसिकता असते. यांची अभिरुची अत्यंत उच्च दर्जाची असते. तेव्हा तुळ राशीच्या व्यक्तींना दि. 18/05/2025 नंतरचा कालखंड अत्यंत चांगला ठरणार आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक वाढेल. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होतील, स्वप्ने साकार होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व आपल्या कलागुणांचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल.
सुसंधी, प्रसिद्धीसाठी अनुकूल कालखंड
दि. 01/06/2025 ते दि. 29/06/2025
दि. 27/07/2025 ते दि. 24/10/2025
दि. 02/11/2025 ते दि. 05/12/2025
सार्वजनिक कार्य, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र, बँकिंग, सहकार, धार्मिक व आध्यात्मिक संस्था या क्षेत्रातील तूळ राशीच्या व्यक्तींना दि. 14/05/2025 नंतरचा कालखंड चांगला आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मानसन्मान मिळतील. प्रतिष्ठा लाभेल. तुमचा नावलौकिक होईल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला अधिकारपद लाभेल. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. तुम्ही आपल्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल.
मान, प्रतिष्ठेसाठी चांगला कालखंड
दि. 01/01/2025 ते दि. 05/06/2025
दि. 16/07/2025 ते दि. 16/09/2025
दि. 16/11/2025 ते दि. 16/12/2025
सारांश : तूळ राशीच्या व्यक्तींना या वर्षाचा उत्तरार्ध अधिक यशदायक आहे. वर्षाच्या पूर्वार्धात तुळा राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्य बिघडण्याची फार मोठी शक्यता आहे.
दि. 14/05/2025 पासून आपली प्रगती अनेक क्षेत्रात होईल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुमची वाटचाल योग्यरितीने सुरू राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे.
दि. 14/05/2025 नंतर मुलामुलींची प्रगती वेगाने सुरू होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागतील. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.