ज्ञानात भर : उष्ण नेपच्यून

युरेनस व नेपच्यून या दोन वायुग्रहांपैकी युरेनस सूर्यापासून सुमारे 287 कोटी कि. मी. दूर आहे. नेपच्यून 450 कोटी कि. मी. दूर आहे व त्याला युरेनसच्या तुलनेत सूर्याची उष्णता कमी प्रमाणात मिळते. तरीही दोन्ही ग्रहांच्या पृष्ठीय तापमानात फारसा फरक नाही. नेपच्यूनच्या उष्णतेचे रहस्य शास्त्रज्ञांनी आता उलगडले आहे.

नेपच्यूनच्या वातावरणातील मिथेनमुळे हा ग्रह अधिक उष्ण राहतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नेपच्यूनच्या वातावरणात सुमारे 1.9 टक्के एवढा मिथेन वायू आहे. मिथेन वायू एक हरितगृह वायू आहे. या वायूमुळे सूर्याची उष्णता ग्रहाच्या वातावरणामध्ये बंदिस्त होते. नेपच्यूनच्या उष्ण तापमानाचे हे एक कारण आहे. याशिवाय नेपच्यून ग्रहाचा गाभा युरेनसच्या तुलनेत अतिशय उष्ण आहे. यामुळे नेपच्यूनला अंतर्गत उष्णता मिळते, जी युरेनसला मिळत नाही. 'लाईव्ह सायन्स' या नियतकालिकात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news