मोला मोला असे शास्त्रीय नाव असलेल्या माशाला एक समर्पक नाव आहे सन फिश म्हणजे सूर्य मासा. गोल आकार व सूर्यकिरणांसारखी पंखांची रचना यामुळे या माशाला सन फिश नाव पडले असावे. सन फिशचा रंग चंदेरी असतो व उष्ण कटिबंधीय उबदार व खोल महासागरात हा मासा आढळतो. मोठ्या आकारांच्या माशांपैकी एक असलेल्या मोला मोलाची उंची 14 फूट व लांबी 10 फूट असते तर वजन 2500 किलोपर्यंत वाढू शकते.
सन फिशचा मुख्य आहार आहे जेली फिश. छोटे मासे, समुद्री शैवाल खाणारे हे मासे निरुपद्रवी आहेत. आकाराने मोठे असूनही या माशांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जात नाही हे विशेष. काही कोळ्यांनी जाळ्यात सापडलेले सन फिश पुन्हा पाण्यात सोडून दिल्याची उदाहरणे आहेत. सन फिशची मादी एकाच वेळी सहाशे अंडी देते. तरीही सन फिश अस्तित्व धोक्यात असलेल्या जलचरांपैकी एक आहे.