इरिस. गेल्या दशकातील खगोलशास्त्रातील महत्त्वाच्या शोधांपैकी इरिस या खुज्या ग्रहाचा शोध महत्त्वाचा मानला जातो. सौरमालेतील तीन ग्रहांपैकी एक असलेल्या इरिसचा शोध जानेवारी 2005 रोजी पालोमार खगोलशाळेच्या शास्त्रज्ञांनी लावला. इरिस हा प्लुटो या खुज्या ग्रहाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी मोठा आहे. 1,163 कि. मी. त्रिज्या असलेला इरिस सूर्यापासून अतिशय दूर आहे. प्लुटो व सूर्य यांच्यातील अंतराहून तिपटीने जास्त अंतरावर इरिस आहे.
सूर्याला 558 पृथ्वी वर्षात एक प्रदक्षिणा घालणार्या इरिसच्या पृष्ठभागाचे तपमान उणे 247 अंश ते उणे 217 अंश असल्याने इरिसवर बर्फ असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. सूर्याचा प्रकाश अतिशय कमी प्रमाणात पोहोचत असल्याने तेथील वातावरण चक्क गोठते. प्लुटोप्रमाणे सफेद व खडकाळ पृष्ठभाग असलेल्या इरिसचा डायसोमिया नावाचा चंद्रही आहे. इरिस आता सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठी दहावी खगोलीय वस्तू आहे. इरिसच्या शोधामुळे सूर्यमालेच्या जडणघडणीवर प्रकाश पडणार आहे.