

लीमर हा प्रीमेटस् या गटातील तुलना माकडाशी होते. अंगावर दाट केसांचे आवरण असणारा हा प्राणी लांब शेपटीचा आणि मोठ्या डोळ्यांचा असतो. मडागॅस्कर या आफ्रिकेतील बेटावर हा प्राणी आढळतो, त्याचप्रमाणे आशियातील काही भागातही तो आढळतो. बहुतेक लीमर्स हे झाडांवर राहतात. अपवाद फक्त रिंगटेल्ड लीमरचा असतो. हे लीमर जमिनीवर राहतात. काळ्या, गोल शेपटीमुळे या लीमरचे नाव 'रिंग टेल्ड लीमर' असे पडले आहे. जवळपास सर्व प्रकारचे अन्न ते खातात. त्यामध्ये फळे, बिया आणि कीटक आणि छोटे पक्षी यांचा समावेश असतो. बरेचसे लीमर रात्री जास्त क्रियाशील असतात. केवळ रिंग टेल्ड लीमर हे दिवसा क्रियाशील असतात. मडॉगस्करमध्ये एक मोठा लीमर राहत असून, तो सिफाका या नावाने ओळखला जातो. तो काळ्या दुनिया प्राण्यांची आणि पांढऱ्या रंगाचा असून त्याच्यावर लाल आणि चॉकलेटी रंगाच्या खुणा आहेत.
लीमरच्या हात आणि शरीरादरम्यान त्वचेचा एक पडदा असतो. याचा उपयोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यासाठी होत असतो. आपल्या वास घेण्याच्या ज्ञानेंद्रियांचा वापर ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात. या प्राण्याच्या खालच्या बाजूला आणि पावलांवर स्केंट ग्रंथी असतात. जात असलेल्या मार्गावर या ग्रंथींद्वारे विशिष्ट प्रकारचा वास सोडला जातो. सर्वात छोटा लीमर हा १३ सेंटिमीटर लांबीचा असून, १५ सेंटिमीटर लांबीची शेपटी असते. तो 'माऊसलीमर' या नावाने ओळखला जातो. हा छोटा प्राणी चरबीची साठवण शेपटीच्या खालच्या भागात करतो आणि प्रतिकूल परिस्थितीत या चरबीचा वापर जगण्यासाठी करतो.