Bread slice | जाणून घ्या... ब्रेड स्लाईसचा जन्मप्रवास

Bread slice
Bread slice | ब्रेड स्लाईसचा जन्मप्रवास Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: सकाळचा नाश्ता असो किंवा शाळेचा डबा, प्रवास असो वा सहल, खाण्यासाठी सर्वात सुलभ आणि आवडता खाद्यपदार्थ म्हणजे ब्रेड स्लाईस किंवा त्यापासून बनलेले पदार्थ. मित्रांनो, बेडला स्लाईसचे रूप देण्याचा विचार सर्वप्रथम एका दागिने निर्मात्याने म्हणजे ओटो रोव्हिडर यांनी खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९१२ मध्ये केला होता. त्यांनी एका प्रकारच्या विशिष्ट मशिनद्वारे सर्वप्रथम ब्रेडच्या स्लाईस तयार केल्या होत्या. त्या काळी मशिनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्या बाजारात येऊ शकल्या नाहीत. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा ब्रेडच्या स्लाईस बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यावेळी ब्रेड स्लाईस पसरलेल्या असल्यामुळे त्या लवकर कोरड्या होण्याची भीती असायची. ब्रेड लवकर शिळा होऊ नये आणि मऊ राहावा म्हणून अनेक प्रकारचे प्रयत्न केले गेले. कधी त्यांना पीन लावून एकत्र ठेवले गेले तर रबर बँडच्या सहाय्याने बांधण्यात आले. मात्र अशा प्रकारे स्लाईस एकत्र करण्यात यश मिळाले नाही.

शेवटी १९२८ मध्ये ब्रेड स्लाईस करण्यासाठी एक पाच फूट लांब आणि तीन फूट रुंद असे स्लाईसर मशिन बनवण्यात आले. या मशिनमुळे ब्रेड एकसारख्या स्लाईसमध्ये कापला गेला. इतकेच नाही तर तो एकत्र ठेवणेदेखील शक्य झाले. व्यापारी पातळीवर पहिल्यांदा सात जुलै १९२८ या दिवशी क्लिओथ बेकिंग कंपनीने श्क्लीन मेड स्लाईसड् ब्रेड या नावाने विकला. त्या काळात हा ब्रेड 'ग्रेटेस्ट फॉरवर्ड स्टेप इन द बेकिंग इंडस्ट्री सिन्स् ब्रेड बॉज रॅप्ड्' अशा आशयाची जाहिरात दिली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत ब्रेडची विक्री सातत्याने वाढतच आहे. एकट्या ब्रिटनमध्ये एका दिवसात आठ कोटी ब्रेडच्या स्लाईस विकला जातात.

भारतातही ब्रेड आवडणाऱ्यांची संख्या कमी नाही. एका वर्षात अंदाजे ३७ लाख ५० हजार टनपर्यंत ब्रेडची मागणी असल्याचा अंदाज वर्तवला जातो. आज जगभरात स्लाईस ब्रेड आपले स्थान राखून आहे. मात्र स्लाईसचा आकार सगळ्या ठिकाणी एकसारखा नाही. ब्रिटनमध्ये पाच मिलिमीटर ते दोन सेंटीमीटर जाडीचा ब्रेड मिळतो; तर कॅनडात १ सेंटीमीटर जाड ब्रेड मिळतो. अमेरिकेतील लोक २ ते ४ सेंटिमीटरच्या जाड ब्रेड स्लाईस खातात. भारतात मिळणाऱ्या ब्रेडची जाडी १ ते २ सेंटीमीटरपर्यंत असते
.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news