Richard Dickinson | अमेरिकन वैद्यक शास्त्रज्ञ रिचर्ड डिकिन्सन

अमेरिकन वैद्यक शास्त्रज्ञ रिचर्ड डिकिन्सन
Heart
मानवी जीवनात 'हृदय' हा प फार महत्त्वाचा अवयव आहे. File Photo
Published on
Updated on

मानवी जीवनात 'हृदय' हा प फार महत्त्वाचा अवयव आहे. अन्य स्नायूंप्रमाणे हृदयातील स्नायूंनाही सतत रक्तपुरवठा करावा लागतो. त्यात काही अडथळा निर्माण झाल्यास रक्तपुरवठा खंडित होतो. हृदयाची क्रिया बंद होते व माणूस मृत्युमुखी पडतो. रक्तपुरवठा कमी झाल्यास वा नियमित न झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

या रक्त पुरवठ्याची क्रिया नीट होत आहे किवा नाही हे अगोदरच समजू शकेल का? याचे निदान करणे समजू शकेल का? याचा विचार रिचर्ड डिकिन्सनच्या मनात येताच रुधिराभिसरणाच्या एकूण प्रक्रियेचे त्याने संशोधन सुरू केले. हा अमेरिकन वैद्यक शास्त्रज्ञ होता. त्याने विकसित केलेल्या तंत्रामुळे कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता बाह्य रक्तवाहिन्यांतूनही त्याचा वेध घेता येतो. रोहिणी शुद्ध जाणारी बारीक सूक्ष्मनलिका सरळ हृदयापर्यंत नेता येते व शकते. कोणती रक्तवाहिनी तुंबून राहिली आहे, रक्ताभिसरणात कोठे गाठ झाली आहे, हृदयाची झडप निकामी झाली आहे का? अशा सर्व गोष्टी न्याहाळून तत्काळ उपाय करता येतो. या संशोधनातून 'कॅथेटरायझेशन' हे तंत्र निर्माण झाले. हृदयाच्या विकाराच्या चिकित्सेला मदत झाली. हार्ट अॅटॅकचे आधीच निदान होऊ लागले. या संशोधनाबद्दल १९५६ चा नोबेल पुरस्कार फोर्समन व कोर्नाड यांच्याबरोबर त्याला विभागून देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news