चांद्रयान-3 | पुढारी

भारताच्या 'इस्त्रो' या अंतराळ संशोधन संस्थेच्या चांद्रयान-3 या आगामी मोहिमेबद्दल लोकांना फारशी कल्पना नाही. चांद्रयान-3 ही मोहीम इस्त्रो व जपानची अंतराळ संशोधन संस्था 'जाक्सा'तर्फे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत 2024 साली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक लँडर व रोव्हर पाठवण्यात येईल. 

'जाक्सा'तर्फे प्रक्षेपण यान व रोव्हर देण्यात येईल तर इस्त्रो लँडर विकसित करेल. प्रक्षेपण यान एच-3 प्रकारचे असेल. एच-3 प्रकारच्या प्रक्षेपण यानात द्रवरूप इंधनाबरोबर घनरूप इंधनाचाही वापर होतो. यामुळे जास्त प्रमाणात सामग्री अंतराळात पाठवणे शक्य होते. 

जपानच्या टानागेशिमा येथून यानाचे उड्डाण होईल. चंद्रावरच्या दक्षिण धु्रवावरच्या पाण्याचा शोध या मोहिमेद्वारे घेण्यात येईल. तसेच अजूनपर्यंत अज्ञात राहिलेल्या चंद्राच्या धु्रवीय पृष्ठभागाचाही अभ्यास करण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news