हात नसलेला धनुर्धर | पुढारी | पुढारी

हात नसलेला धनुर्धर | पुढारी

अमेरिकेच्या आयोव्हा राज्यातील मॅट स्टटझ्मन हा जगातील सर्वोत्तम धनुर्धर मानला जातो. तिरंदाजी स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धांत त्याने पदके पटकावली आहेत. तुम्हाला हे कळल्यावर धक्का बसेल, की या उत्कृष्ट तिरंदाजाला दोन्ही हात नाहीत. जन्मत:च दोन्ही हातांशिवाय जन्मलेला मॅट स्टटझ्मन म्हणजे चालतेबोलते आश्चर्यच आहे. मॅट तिरंदाजी करतो ते त्याच्या दोन्ही पायांचा वापर करून! डाव्या पायावर धनुष्य ठेवून उजव्या पायाच्या बोटाने मॅट धनुष्याला स्थिर ठेवतो. त्याने गळ्याभोवती विशिष्ट पट्टा बसवला आहे. या पट्ट्यात बाण अडकवून लक्ष्यावर अचूक नेम असल्याची खात्री झाल्यावर तो बाण सोडतो. पॅराऑलिंपिक स्पर्धेत तिरंदाजीत त्याने रौप्यपदक मिळवले आहे. त्याच्या नावावर सर्वात दूरच्या अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याचा विक्रमही आहे. 2015 साली सुमारे 930 फूट अंतरावरच्या लक्ष्यावर अचूक बाण मारून    त्याने गिनिज बुकमध्ये स्थान मिळवले.

Back to top button