अद्भुत प्राणी अमेरिकन पिका | पुढारी | पुढारी

अद्भुत प्राणी अमेरिकन पिका | पुढारी

जागतिक तपमान वाढीमुळे ज्या प्राण्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे, त्या प्राण्यांपैकी अमेरिकन पिका एक प्राणी आहे. अमेरिकेतील उत्तर व पश्‍चिमेकडच्या पर्वतराजीत आढळणारा हा प्राणी सशाच्या प्रजातीतील आहे. सहसा हा प्राणी तीन हजार मीटर्स उंचीवरच्या डोंगराळ भागात आढळतो. थंड वातावरणात राहत असल्याने याच्या अंगावर दाट केसांची फर असते व शेपटी लांबलचक, झुपकेदार असते.

याच्या केसांचा रंग फिकट तपकिरी असतो. हा प्राणी समूहाने राहतो. गवत व वनस्पती खाऊन जगणारा हा प्राणी हिवाळ्याच्या काळात अन्नबिळात साठवतो. याची लांबी साधारणपणे साडे सहा ते साडे आठ इंच असते. अमेरिकन आदिवासी जमाती याची शिकार करत. स्थानिक अमेरिकन भाषेत याला ‘लिटल हेअर चीफ’ असे नाव आहे. तापमानवाढीचा या प्राण्याच्या संख्येवर फार लवकर परिणाम होतो.

जर तापमान 25.5 अंश सेल्सिअसच्या वर गेले, तर अशा वातावरणात अमेरिकन पिकाचा सहा तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो. यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर असतो व तपमान जास्त असते तेव्हा हा प्राणी बिळामध्ये लपून बसतो. काही शास्त्रज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढीमुळे हा प्राणी लवकर अस्तंगत होण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या

Back to top button