ज्ञानात भर : सहारा वाळवंटाचे वय | पुढारी

ज्ञानात भर : सहारा वाळवंटाचे वय

सहारा वाळवंट हे जगातील सर्वात विशाल व उष्ण वाळवंट आहे. या वाळवंटाची निर्मिती कधी झाली, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. सहाराची निर्मिती मिओसीन कालखंड (50 लाख ते 2.5 कोटी वर्षे) ते होलोसीन कालखंड (11,650 वर्षे) या दरम्यान कधीतरी झाली, असे मानण्यात येत होते. युएस जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार सहाराची निर्मिती सुमारे 46 लाख वर्षांपूर्वी झाली. उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यालगतच्या बेटांवरील मातीचे नमुने शास्त्रज्ञांनी तपासले. या बेटांवर सहारा वाळवंटातील वाळू लाखो वर्षांपासून वार्‍यामुळे उडून येत आहे. 46 लाख वर्षांपूर्वी सहारा हा हिरवळीचा प्रदेश होता. जो संथगतीने वाळवंटात रूपांतरित झाला.

Back to top button