अजब-गजब : सक्रिय ज्वालामुखीच्या सान्निध्यात! | पुढारी

अजब-गजब : सक्रिय ज्वालामुखीच्या सान्निध्यात!

इटलीतील सिसिली प्रांताच्या उत्तरेला स्ट्रॉम्बोली नावाचे बेट आहे. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी या बेटावर आहे. गेली दोन हजार वर्षे येथील ज्वालामुखी अधून मधून लाव्हारस बाहेर टाकतो. तरीही या बेटावर सुमारे 300 लोकांची वस्ती आहे. 1940 च्या सुमारास येथल्या रहिवाशांची संख्या सुमारे चार हजार होती. परंतु वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत राहिल्याने अनेक जणांनी अमेरिका व युरोपातील अन्य देशांत स्थलांतर केले. या बेटाला पर्यटक व भूगर्भशास्त्रज्ञ नेहमीच भेट देतात. गेल्या शंभर वर्षांमध्ये या ज्वालामुखीचे तीन मोठे उद्रेक झाले आहेत. 


 

संबंधित बातम्या
Back to top button