नाईल नदीचा जन्म | पुढारी | पुढारी

नाईल नदीचा जन्म | पुढारी

आफ्रिका खंडाची जीवनवाहिनी अशी नाईल नदीची ओळख आहे. इजिप्शियन संस्कृतीसहित अनेक प्राचीन संस्कृती या नदीच्या काठावर निर्माण झाल्या. आतापर्यंत असे मानण्यात येत होते, की नाईल नदीचा जन्म सुमारे 50 लाख वर्षांपूर्वी झाला.

एका नव्या संशोधनानुसार नाईल नदीचे वय कितीतरी अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. नाईल नदी सुमारे 3 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली आहे, असे मत ‘जॅक्सन स्कूल ऑफ जिओसायन्सेस’च्या संशोधकांनी व्यक्‍त केले आहे.

नाईल नदीचा उगम जेथे होतो तो इथियोपिअन डोंगराळ भाग, नाईलचा त्रिभूज प्रदेश व तिच्या उपनद्यांतील गाळखडकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात याबद्दल लेख प्रकाशित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button