करून पहा, पाहून करा : गाजराचे जिराफ | पुढारी

करून पहा, पाहून करा : गाजराचे जिराफ

आवश्यक साहित्य :

दोन ते चार गाजरे, हिरवे वाटाणे, मुळ्याची चार कापे, कोथिंबिरीची पाने, टुथपिक्स.

कृती :

• दोन मोठी गाजरे घेऊन त्यांचा वरचा भाग काढून टाका. दोन्ही गाजरापासून एक मोठा व एक लहान असे चार तुकडे करा. • मोठ्या तुकड्यांचा वापर जिराफाची मान, पुढचे पाय व धड बनवण्यासाठी करा. लहान तुकड्यांपासून जिराफाचे मागचे पाय व डोके बनवा.• सर्व तुकडे टुथपिक्सने जोडा.• मुळ्यांचे चार गोलाकार काप चार भागांत कापून जिराफाच्या धडावर चिकटवा. जिराफाच्या शरीरावरचे ठिपके तयार होतील.• मुळ्याच्या कापापासून जिराफाचे दोन कान बनवा व डोक्याला चिकटवा.• हिरव्या वाटाण्यापासून जिराफाचे डोळे व कान बनवा व ते डोक्याला चिकटवा.• जिराफाच्या मानेच्या मागे व शेपटीच्या जागी कोथिंबीर लावा.

तुमचे जिराफ तयार झाले.

संबंधित बातम्या

Back to top button