प्राचीन फुगे | पुढारी | पुढारी

प्राचीन फुगे | पुढारी

मायकेल फॅरेडे याने 1824 साली रबरी फुग्याचा शोध लावला. फुग्यांपासून आता विविध प्राण्यांचे आकारही बनवले जातात. प्राचीन काळी मात्र प्राण्यांच्या आकाराचे नाही, तर प्राण्यांपासून फुगे बनवले जात. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅझटेक जमात हे फुगे बनवत असे. हे फुगे चक्‍क प्राण्यांच्या आतड्या, मूत्राशय व चरबीपासून बनवले जायचे.

हे फुगे मुलांच्या मनोरंनासाठी नाही, तर अ‍ॅझटेक लोकांच्या देवतेला अर्पण करण्यासाठी बनवले जात. प्रामुख्याने डुकराची चरबी व मांजराच्या आतड्यांपासून हे फुगे बनवले जात. अ‍ॅझटेक संस्कृतीत प्राण्यांना महत्त्व होते. ज्या प्राणीघटकापासून फुगे बनवले जात, त्याला प्रथम स्वच्छ धुतले जात असे. सूर्यप्रकाशात वाळवले जात असे. त्यानंतर त्यात हवा भरून फुग्यासारखा आकार दिला जात असे. हे फुगे आताच्या फुग्यांप्रमाणे रंगीबेरंगी व आकर्षक नव्हते. देवतेला फुगे अर्पण केल्यानंतर फुगे जाळले जात. यामुळे देवता खूश होते, अशी अ‍ॅझटेक लोकांची अंधश्रद्धा होती.

संबंधित बातम्या
Back to top button