द्रास खोरे भारतातील सर्वात थंड ठिकाण | पुढारी

द्रास खोरे भारतातील सर्वात थंड ठिकाण

‘लडाखचे प्रवेशद्वार’ अशी ओळख असलेले द्रास खोरे आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात थंड ठिकाण म्हणूनही या भागाची वेगळी ओळख आहे. काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यातील द्रास खोरे सुमारे 10,990 फूट उंचीवर आहे. द्रास खोरे चहूबाजूने 16 हजार ते 21 हजार फूट उंचीच्या पर्वत शिखरांनी वेढलेले आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे 45 ते उणे 60 अंश सेल्सिअस एवढ्या खाली जाते. 9 जानेवारी 1995 रोजी येथे उणे 60 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. द्रास खोरे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे थंड ठिकाण आहे. असे म्हणतात की, जगात सायबेरियानंतर  मानवी वस्ती असलेले सर्वात थंड ठिकाण द्रास खोरेच आहे. या भागात हिंदू, मुस्लीम व बौद्ध अशा तिन्ही धर्मांचे सुमारे 1,500 लोक राहतात. लष्करीद‍ृष्ट्या द्रास खोरे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील अत्यंत थंड तपमानात भारतीय जवान देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. 1999 च्या कारगिल युद्धानंतर येथे हुतात्मा जवानांचे स्मारक बांधण्यात आले आहे. हे खोरे पर्यटकांनाही आकर्षित करते. द्रासच्या आसपासची द्रौपदी कुंड, ब्रिगेड वॉर गॅलरी, टायगर हिल, टोलोलिंग जलप्रपात ही ठिकाणे पाहायला देशविदेशातील पर्यटक येतात.

Back to top button