

नेपच्युनच्या दक्षिण ध्रुवावरील सर्वात वरच्या ट्रॉपोस्फीअर भागातील तापमान हे इतर भागातील तापमानापेक्षा 10 डीग्री सेंटीग्रेटने गरम असल्याचे 2007 मध्ये केलेल्या संशोधनात सिद्ध झाले. या तापमानातील फरकामुळे या भागातून मिथेन वायू बाहेर पडतो तर बाकी ठिकाणी तो बर्फामधे असतो.
नेपच्युनवरील मोठा डाग हा त्याच्या झुकलेल्या अक्षामुळे तसेच हा भाग म्हणजेच दक्षिण ध्रुव गेली चाळीस वर्षे सूर्याच्या समोर राहिल्यामुळे आहे. नेपच्युनची भ्रमणकक्षा ही 1.77 डिग्री इतकी कललेली असल्यामुळे ती लंबगोलाकार आहे.
या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना सूर्य आणि नेपच्युनचे अंतर 101 कोटी कि.मी. इतके असते. या भ्रमणकक्षेत पेरीहेलीऑन आणि अॅफेलीऑन हे अनुक्रमे सगळ्यांत जवळचा आणि लांबचा बिंदू आहेत.
जसा पृथ्वीला एक चंद्र आहे तसे नेपच्युनला 13 चंद्र आहेत. नेपच्युन आपण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. एखाद्या शक्तिशाली दुर्बिणीतूनच आपण युरेनसबरोबर नेपच्युनला पाहू शकतो. नेपच्युनची सूर्याभोवती फिरण्याची गती खूपच मंद असल्यामुळे पृथ्वीच्या जवळून जाताना इतर ग्रह त्याच्या विरुद्ध दिशेने जात असल्याचा भास होतो.
1846 मध्ये तो पृथ्वीच्या जवळून जात असताना त्याचा शोध लागला. व्हॉयेजर 2 या अवकाशयानाने 25 ऑगस्ट 1989 रोजी नेपच्युनची सर्वात जवळची छायाचित्रे घेतली. या अवकाशयानाने सिद्ध केले की युरेनस ग्रहाप्रलमाणेच नेपच्युनभोवतीही चुंबकीय क्षेत्र आहे. या अवकाशयानानंतर म्हणजे 1989 नंतर दुसरे कोणतेही यान नेपच्युनच्या जवळ गेले नाही. (उत्तरार्ध)