कर्क : नवीन संधी लाभेल, वार्षिक राशिभविष्य 2022 | पुढारी

कर्क : नवीन संधी लाभेल, वार्षिक राशिभविष्य 2022

कर्क राशीच्या व्यक्तींकडे सात्त्विकता असते. प्रेमळपणा असतो. विशुद्ध मन ही परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे. कोणत्याही गोष्टीत जीव ओतून काम करण्याचा आपला स्वभाव आहे. ग्रहण शक्ती व कल्पना शक्ती चांगली असते. कर्क राशीच्या व्यक्ती जन्मजात नेते असतात. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अपूर्व इच्छाशक्ती, संघटन चातुर्य, उत्कट ध्येयवाद, देशाभिमान या गुणांबद्दल आपण प्रसिद्ध असता.

आपल्याकडे दूरदृष्टी असते. पुढे होणार्‍या गोष्टीचा आपण वेध घेऊ शकता. कर्क राशीच्या व्यक्तींकडे आपोआप नेतृत्व येते व त्यांना लवकर लोकप्रियता लाभते. आपल्याकडे अधिकारपद चालून येते. या राशीवर भाळण्याचा पगडा अधिक असतो. त्यामुळे कर्क रास एकदम आनंदाकडे जाते, तर कधी एकदम दु:खाकडे जाते. चंद्राचा अंमल असल्यामुळे भावनेमध्ये व वृत्तीमध्ये सतत चढ-उतार होत असतो.

कर्क : आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. आपल्याला स्वास्थ्य लाभेल. सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहाल. जीवनाकडे पाहण्याचा आपला कल बदलेल. आशावादी बनाल. आरोग्य चांगले राहणार असल्याने आरोग्याच्या फार अडचणी राहणार नाहीत. अनेक दृष्टीने हे वर्ष चांगले असल्यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहणार आहे व त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होईल. आरोग्याची एकूण कालखंडात काळजी करण्याचे कारण नाही.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 27/04/2022 ते दि. 12/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 31/08/2022
दि. 25/09/2022 ते दि. 18/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 05/12/2022

सध्या कोरोनाची साथ आहे. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी दि. 15/01/2022 ते दि. 07/04/2022 या कालखंडात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हा कालखंड उलटसुलट घटनांचा, जबाबदारी वाढण्याचा व मानसिक ताणाचा आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.

कर्क : व्यवसाय व आर्थिक स्थिती

व्यवसाय, आर्थिक स्थिती, उद्योगाच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. यावर्षी कोणतीही मोठी गुंतवणूक करत असताना बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करावा. व्यवसायामध्ये कोणतीही संधी आपणासमोर चालून आल्यास त्यामध्ये जर मोठी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव असेल तर त्यावर पहिला सखोल विचार करावा. त्यातून आपला काय फायदा किंवा तोटा होईल याचा विचारविनिमय करावा आणि मगच निर्णय घ्यावेत. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये.

व्यवसाय, आर्थिक स्थिती, उद्योगाच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना एप्रिलनंतरचा कालखंड समाधानकारक आहे. तुमचे व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील. तुमचा संपर्क वाढेल. व्यवसायामध्ये अनपेक्षितपणे एखादी नवीन संधी लाभण्याची शक्यता आहे. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभेल. तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे व्यवसायाकडे तुम्ही विशेष लक्ष देऊ शकाल. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स यांना यावर्षी सावधगिरीने काम करावे लागेल. कामात विलंब होणार आहे. अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे.

खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 14/03/2022 ते दि. 01/04/2022
दि. 14/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 10/08/2022 ते दि. 15/10/2022
दि. 17/11/2022 ते दि. 31/12/2022

नोकरी

कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने मार्च 2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. विशेषत: दि. 12 एप्रिल 2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. तुमची मनःस्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे. तुमचे अनुभव, परिश्रम याचे चीज होणार आहे. नोकरीत फार कटकटी होणार नाहीत. काहींना बढतीची शक्यता आहे.

खालील कालखंड नोकरीच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 14/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 18/05/2022 ते दि. 26/06/2022
दि. 16/08/2022 ते दि. 26/09/2022
दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होताना किंवा घराचे बांधकाम पूर्ण होताना विलंब होणार आहे. अनपेक्षित अडचणी येणार आहेत. ज्यांना प्रॉपर्टीची कामे करावयाचीच आहेत, त्यांना खालील कालखंड अनुकूल ठरतील.

खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.

दि. 27/02/2022 ते दि. 31/03/2022
दि. 27/04/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 24/09/2022
दि. 18/10/2022 ते दि. 13/11/2022

संततिसौख्य

कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात सर्वसामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. यावर्षी आपले नवीन हितसंबंध निर्माण होतील. नवीन परिचय वाढतील. परंतु; त्याचा फायदा झालाच पाहिजे अशी अपेक्षा करू नये. काहींना नोकरीमध्ये सुसंधी लाभेल. संततिसौख्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा सर्व कालखंड अतिशय चांगला व लाभदायक ठरणार आहे.

मुला-मुलींचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळेल. शाळा, कॉलेज प्रवेशाचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच नोकरी, व्यवसायाचे प्रश्न सुटतील. मुला-मुलींची चांगली प्रगती होईल. त्यांच्या संदर्भात तुम्हाला समाधान लाभणार आहे.

खालील कालखंड संततिसौख्याच्या व विद्यार्थ्यांच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 01/01/2022 ते दि. 16/01/2022
दि. 27/04/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 24/09/2022
दि. 18/10/2022 ते दि. 31/12/2022

कर्क राशीच्या व्यक्तींना मुला-मुलींच्या संदर्भात त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, त्यांची प्रगती या सर्व दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड अत्यंत चांगला ठरणार आहे. तसेच बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना हा कालखंड चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय दि. 12/04/2022 नंतरच घ्यावेत.

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्यासंदर्भात कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 12/04/2022 पासून कर्क राशीच्या व्यक्तींना गुरूची अनुकूलता लाभणार आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. वैवाहिक जीवनात मानसिक प्रसन्नता लाभेल. दि. 12/04/2022 नंतर वैवाहिक जीवनातील कटकटी, मतभेद कमी होत जातील. कौटुंबिक सौख्य चांगले राहणार आहे.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने चांगला आहे.
दि. 28/04/2022 ते दि. 13/07/2022
दि. 01/09/2022 ते दि. 18/10/2022
दि. 13/11/2022 ते दि. 31/12/2022

प्रवास

प्रवास, सुसंधी, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/4/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड धार्मिक कार्य, तीर्थयात्रा यासाठी चांगला आहे. यावर्षी परदेश प्रवासाचे, तीर्थयात्रेचे योग निश्चित येणार आहेत व प्रवास सुखकर होणार आहे. प्रवासासाठी खालील कालखंड अनुकूल ठरेल.
दि. 13/04/2022 ते दि. 14/10/2022
दि. 13/11/2022 ते दि. 31/12/2022

सुसंधी, प्रसिद्धी

सुसंधी, प्रसिद्धी, आपल्या कार्यक्षेत्रात यश लाभणे आपल्या मनोकामना पूर्ण होणे, आपल्या आशाआकांक्षा सिद्धीला जाणे या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य या क्षेत्रांतील व्यक्तींना
दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड विशेष अनुकूल ठरणार आहे.

नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, संगीत, नाट्य या क्षेत्रांत कार्य करण्याची संधी लाभेल. धार्मिक कार्यात, आध्यात्मिक क्षेत्रात व विविध संस्थांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा विशेष महत्त्वाचा आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांची साथ लाभणार आहे. नवीन परिचय होणार आहेत. एखाद्या नवीन क्षेत्राचा शोध लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जीवनात काहीतरी चांगले नाट्यमय, प्रगतीकारक, उन्नतीकारक असे काही तरी होण्याची शक्यता आहे.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या द़ृष्टीने काही प्रमाणात लाभदायक ठरतील.
दि. 27/02/2022 ते दि. 31/03/2022
दि. 29/04/2022 ते दि. 15/10/2022
दि. 21/10/2022 ते दि. 31/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष प्रतिष्ठा, मानसन्मान, सार्वजनिक, राजकीय कार्यात यश या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. आशावादाने कार्यरत राहाल. आपल्याकडे नेतृत्व उपजतच असते. त्यामुळे ग्रहस्थिती जरी संमिश्र स्वरूपाची असली तरीही आपला जनतेमधील वावर कमी करू नये. जनतेशी एकरूप राहावे. त्यांच्या संपर्कात राहावे. आपली जनमानसावर नैसर्गिक पकड असते. कर्क राशीच्या व्यक्तींना एक नैसर्गिक आकर्षण शक्ती आहे.

सार्वजनिक जीवन, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्र या सर्व दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 12/04/2022 नंतर नवीन दिशा सापडेल. नवा मार्ग दिसेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज चांगले ठरणार आहेत. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. धार्मिक कार्य, आध्यात्मिक क्षेत्र, शैक्षणिक, सांस्कृतिक, सर्व क्षेत्रांमध्ये तुमची आगेकूच होणार आहे. सर्व क्षेत्रांत तुमचे पाऊल पुढे पडेल.

खालील कालखंड प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता या द़ृष्टीने काही प्रमाणात लाभदायक ठरतील.

दि. 01/01/2022 ते दि. 16/01/2022
दि. 27/02/2022 ते दि. 01/04/2022
दि. 14/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 18/05/2022 ते दि. 10/08/2022
दि. 16/08/2022 ते दि. 16/09/2022
दि. 13/11/2022 ते दि. 31/12/2022

सारांश

कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा गुरू भाग्यस्थानी येत असल्यामुळे अनेक दृष्टीने चांगला ठरणार आहे. आरोग्य चांगले राहील. मानसिक स्थिती चांगली राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी लाभेल. विशेषत: तुमचे निर्णय अचूक ठरतील. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात पुढच्या वर्षाचे नियोजन करू शकता.

नोकरी, व्यवसाय, संततिसौख्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात सुसंधी, अनेकांचे सहकार्य, हाती घेतलेल्या कामात यश या सर्व दृष्टीने तसेच घरात मंगलकार्य, विवाहेच्छूंचे विवाह जमणे, शुभ कार्य होणे या सर्व दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड कर्क राशीच्या व्यक्तींना चांगला ठरणार आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगली वार्ता घेऊन येणार आहे. आजपर्यंत जे काही घडू शकले नाही ते, जी कामे हातात आहेत ती मार्गी लागणार आहेत. कौटुंबिक जीवनात मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात मंगल कार्य घडेल.

प्राचार्य रमणलाल शहा

Back to top button