वृषभ : वार्षिक राशीभविष्य २०२२ : वेगवान प्रगती | पुढारी

वृषभ : वार्षिक राशीभविष्य २०२२ : वेगवान प्रगती

आपण आनंदी व आशावादी आहात. शांतपणा हा आपला स्थायीभाव आहे. आपल्याकडे नैसर्गिक सहनशीलता व सोशिकता आहे. आपल्याकडे विनयशीलता, नम्रता व प्रेमळपणा हे गुण आहेत. साहित्य, कला, संगीत, नाट्य, चित्रपट यांची आपणास विशेष आवड आहे. आपल्यावर सोपविलेले काम निष्ठेने, श्रद्धेने, जबाबदारीने व कर्तव्यनिष्ठेने पार पाडणे यामध्ये आपला कोणी हात धरू शकत नाही. कोणत्याही संस्थेचा, उद्योगसमूहाचा कारभार आपण निःस्पृह वृत्तीने करू शकता. जीवनाच्या रंगभूमीवरील कोणतीही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडता. मृगजळाच्या मागे धावण्याचा आपला स्वभाव नाही. आपल्याकडे भरपूर सुप्तशक्ती आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती कौटुंबिक जीवन, स्वास्थ्य, शांतता यांना अधिक किंमत देतात.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. आपल्याला स्वास्थ्य लाभेल. सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहाल. जीवनाकडे पाहण्याचा आपला कल बदलेल. आशावादी बनाल. आरोग्य चांगले राहणार असल्याने आरोग्याच्या फार अडचणी राहणार नाहीत. अनेक दृष्टीने हे वर्ष चांगले असल्यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहणार आहे व त्याचा आरोग्यावर चांगला अनुकूल परिणाम होईल. आरोग्याची एकूण कालखंडात काळजी करण्याचे कारण नाही.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 27/02/2022 ते दि. 22/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 24/09/2022 ते दि. 17/10/2022

व्यवसाय व आर्थिक स्थिती

व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थितीच्या दृष्टीने वृषभ व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. महत्त्वाचे ग्रह गुरू व शनी हे दोन्हीही आपणाला संपूर्ण वर्षभर अनुकूल जाणार आहेत. ग्रहांचीही अनुकूलता असल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त एकाग्रता, चिकाटी व परिश्रम या गोष्टींचा अवलंब करावा. आपल्या चिकाटीला व परिश्रमाला यावर्षी यश मिळणार आहे. व्यवसायामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतील. आपणाला व्यवसाय कसा पुढे घेऊन जायचा आहे याचे नियोजन या वर्षातच करावे. व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने काही नवीन संपर्क तयार होतील. तुमच्या व्यवसायाच्या कक्षा वाढणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 28/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 02/07/2022 ते दि. 21/08/2022
दि. 30/08/2022 ते दि. 24/10/2022

नोकरी

नोकरीतील व्यक्तींना हे वर्ष अत्यंत समाधानकारक आहे. जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल. परंतु; तुम्हाला जे अपेक्षित यश आहे, ते लाभणार आहे. काहींना बदलीचे योग संभवतात. परंतु; बदली चांगल्या ठिकाणी होईल. यावर्षी काहींना बढतीची शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे. आपल्या प्रगतीच्या आड कोणीही येऊ शकत नाही. यावर्षी आपणाला नवीन संधी लाभेल. अनेक वर्षांपासून आपण ज्या संधीची वाट पाहत आहात, ती संधी आपणाला लाभेल. वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. एकूणच वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगली संधी मिळवून देणारे आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी मिळेल. यावर्षी नोकरीमध्ये चांगली प्रगती होणार आहे.
खालील कालखंड

नोकरीच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 14/01/2022 ते दि. 01/04/2022
दि. 15/05/2022 ते दि. 16/07/2022
दि. 17/08/2022 ते दि. 17/10/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टीच्या तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीने वृषभ व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. यावर्षी व्यवसाय चांगला राहणार आहे. आर्थिक आवक चांगली असणार आहे. नोकरीमध्ये काहींना पगारवाढ असणार आहे. त्यामुळे यावर्षी प्रॉपर्टीचे योग समाधानकारकपणे येऊ शकतात.

खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.

दि. 12/02/2022 ते दि. 12/03/2022
दि. 01/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 06/08/2022 ते दि. 24/09/2022
दि. 11/11/2022 ते दि. 15/12/2022

संततिसौख्य

संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना चांगले जाणार आहे. विशेषत: दि. 11/04/2022 नंतरचा कालखंड हा संततिसौख्याच्या दृष्टीने खूपच चांगला जाणार आहे. मुला-मुलींच्या दृष्टीने एखादी चांगली घटना घडेल. शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील. तुम्ही एखाद्या परीक्षेला बसला असाल तर यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे.

खालील कालखंड संततिसौख्याच्या व विद्यार्थ्यांच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 01/01/2022 ते दि. 01/04/2022
दि. 25/04/2022 ते दि. 16/07/2022
दि. 21/08/2022 ते दि. 24/10/2022

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. फक्त दि. 01/05/2022 ते दि. 12/07/2022 या कालखंडात वैवाहिक जीवनात थोडासा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने व विवाह होण्याच्या दृष्टीने, शुभ कार्याच्या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. शुभ कार्यासाठी संपूर्ण वर्ष चांगले आहे. फक्त दि. 12/04/2022 पासून वैवाहिक सौख्य व विवाहेच्छुंचे विवाह या दृष्टीने विशेष अनुकूल कालखंड आहे.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 26/02/2022 ते दि. 01/04/2022
दि. 07/04/2022 ते दि. 28/04/2022
दि. 17/05/2022 ते दि. 26/06/2022
दि. 10/08/2022 ते दि. 15/10/2022

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, थंड हवेच्या ठिकाणी सहली, परदेश प्रवास या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच समाधानकारक आहे. यावर्षी तीर्थयात्रेचे योग येणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत.

दि. 01/03/2022 ते दि. 07/04/2022
दि. 27/04/2022 ते दि. 24/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 24/09/2022
दि. 11/11/2022 ते दि. 16/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकार या दृष्टीने समाधानकारक आहे. प्रतिष्ठा, मानसन्मान, हाती घेतलेल्या कामात यश, सुसंधी अधिकारपद, राजकारण, समाजकारण, सार्वजनिक जीवन यामध्ये पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी आपणाला लाभणार आहेत. विशेषत: दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अधिकार, सार्वजनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात यश, मानमान्यता या दृष्टीने खालील कालखंड चांगले ठरतील.

खालील कालखंड आपणाला मान, प्रतिष्ठा, अधिकार या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 12/02/2022 ते दि. 13/03/2022
दि. 17/08/2022 ते दि. 24/09/2022

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, तुमच्या कार्यक्षेत्रात यश या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. तुमची स्वप्ने साकार होतील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल. सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. साहित्य, शिक्षण, कला, संगीत, नाट्य, प्रकाशन या सर्व क्षेत्रांमध्ये आपण आघाडी मिळवू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. हे वर्ष आपणाला सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने खूपच चांगले आहे.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या द़ृष्टीने काही प्रमाणात लाभदायक ठरतील.

दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 01/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 31/08/2022
दि. 24/09/2022 ते दि. 26/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 08/12/2022

सारांश

हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना खूपच समाधानकारक ठरणार आहे. शनी व गुरू या दोन महत्त्वाच्या ग्रहांची आपणाला यावर्षी पूर्णपणे अनुकूलता आहे. आपणाला यावर्षी नवीन संधी लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. दि. 11/04/2022 पर्यंतचा कालखंड प्रॉपर्टीला चांगला आहे, तर दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा संततिसौख्य, वैवाहिक सौख्य, नातेवाईकांचे सहकार्य या सर्व दृष्टीने चांगला आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष विशेष चांगले आहे. या वर्षाकडे आपणाला आशेने पाहायला हरकत नाही. तुमच्या कार्यक्षेत्रात यावर्षी संधी मिळणार आहे. व्यवसाय, नोकरी, तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी, प्रतिष्ठा, संततिसौख्य या सर्व दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. तुम्ही जितके परिश्रम कराल त्या परिश्रमाला यशाची साथ लाभणार आहे. अपेक्षेपेक्षाही यावर्षी आपणाला विशेष काही प्राप्त होऊ शकते. आपल्या कामात सफलता मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी व गुरू हे दोन्ही ग्रह यावर्षी अनुकूल आहेत. त्यामुळे या वर्षाकडे आशेने व अपेक्षेने पाहावयास हरकत नाही. तुमची कामे मार्गी लागणार आहेत. यावर्षी चमकदार कामगिरी करून दाखवाल. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. अनेक दृष्टीने हे वर्ष आपणाला चांगले आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी हा ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे. थोडा कालखंड वगळता संपूर्ण वर्षभर शनी भाग्यस्थानात राहणार आहे. फक्त दि. 29/04/2022 ते दि. 12/07/2022 या कालखंडात तो कुंभ राशीत जात आहे. अर्थात, मकर आणि कुंभ या दोन्ही राशींतील शनी वृषभ राशीच्या व्यक्तींना हा अत्यंत चांगला असतो. गुरू दहाव्या व अकराव्या स्थानी आहे. हा गुरू अत्यंत अनुकूल आहे. दि. 11/04/2022 पर्यंत तो नोकरी, व्यवसाय व प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहे, तर दि. 12/04/2022 नंतर तो संततिसौख्य, वैवाहिक सौख्य, विवाहेच्छुंचे विवाह जमणे मुला-मुलींची प्रगती होणे, मुला-मुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न मार्गी लागणे, बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभणे, नातेवाईकांचे सहकार्य लाभणे व आर्थिक लाभ समाधानकारक होणे या दृष्टीने गुरू अनुकूल आहे. व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. व्यवसायात नवीन दिशा सापडणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. नोकरीमध्ये व सार्वजनिक कार्यात कर्तृत्त्वाला संधी लाभणार आहे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. काहींच्या हातून एखादे चांगले कार्य घडेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जीवनामध्ये काही तरी भरीव कामगिरी होईल. हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना क्रांतिकारक ठरणार आहे. चांगले परिवर्तन घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना अचानक धनलाभ होतील. लेखकांच्या हातून लेखन व प्रकाशन होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

इतर सर्व राशींमध्ये वृषभ राशीला शनी हा ग्रह जास्त नैसर्गिकरीत्या अनुकूल असतो. दि. 01/04/2022 ते दि. 12/04/2022 या कालखंडात शनी दहाव्या स्थानात आहे, तर उर्वरित सर्व कालखंडामध्ये शनी भाग्यस्थानात आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष कर्तृत्त्वाच्या दृष्टीने, संधीच्या दृष्टीने, यशाच्या दृष्टीने सर्वोत्तम असणार आहे. याशिवाय दि.12/04/2022 पर्यंत गुरू दहाव्या स्थानात, तर दि. 12/04/2022 नंतर तो अकराव्या स्थानात असणार आहे. यामुळे संततिसौख्य, वैवाहिक सौख्य, आर्थिक लाभ, विवाहेच्छुंचे विवाह होणे या सर्व दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्ती यावर्षी नशीबवान ठरणार आहेत. हे वर्ष आपणाला असाधारण यशाचे आहे.

Back to top button