Stretching : व्यायाम करण्यापूर्वी स्ट्रेचिंगची आवश्यकता का?

Stretching
Stretching
Published on
Updated on

व्यायाम करण्यापूर्वी तसेच खेळण्यापूर्वी स्ट्रेचिंग करण्याचा म्हणजे शरीर ताणण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायामापूर्वी केल्या जाणार्‍या स्ट्रेचिंगमुळे आपले शरीर व्यायामासाठी सज्ज होते. व्यायामानंतर स्ट्रेचिंग केल्यानंतर आपले शरीर पूर्ववत होण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतरही स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. ( Stretching )

संबंधित बातम्या 

स्ट्रेचिंग हे डायनॅमिक आणि स्टॅटिक अशा दोन प्रकारचे असते. या दोन्ही प्रकारांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. स्टॅटिक स्ट्रेचिंगमध्ये शरीराच्या सर्वाधिक क्षमतेपर्यंत स्ट्रचिंग केले जाते. शरीराला एका विशिष्ट स्थितीत थांबविले जाते. असे केल्याने अनेक स्नायूंना आराम मिळतो. व्यायामानंतर या पद्धतीच्या स्ट्रेचिंग नंतर शरीराला पूर्ववत स्थितीमध्ये आणले जाते. डायनॅमिक स्ट्रेचिंगमध्ये शरीराला गती मिळते.

हॉकी, फुटबॉल असे खेळ खेळण्यापूर्वी स्ट्रेचिंग करावेच लागते, अन्यथा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. कारण असे खेळ खेळताना शरीराची जलद हालचाल होणे आवश्यक असते. स्ट्रेचिंग केल्यांमुळे आपले स्नायू आणि अन्य अवयव वेगाने हालचाली करण्यासाठी तयार होतात. स्टॅटिक स्ट्रेचिंगमुळे शरीराच्या उडी मारण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे खेळापूर्वी डायनॅमिक स्ट्रेचिंग शरीराला फायदेशीर ठरते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डायनॅमिक स्ट्रेचिंगमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. स्नायू मजबूत होतात.

स्ट्रेचिंग कसे करावे ?

उभे राहून पाय सरळ उचलावा. या स्थितीत हाताने पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करावा. आलटून पालटून दोन्ही पायांनी हा प्रयोग करावा. यानंतर जमिनीवर उताणे झोपा. दोन्ही हात शरीरापासून दूर न्या. एक पाय उचलून दुसर्‍या पायावर अशा पद्धतीने ठेवा की फक्त पंजाच जमिनीला टेकेल. असे करताना आपला उजवा पाय डावीकडे असेल याची काळजी घ्या. दुसरा प्रकार म्हणजे सरळ उभे राहावे, दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवावेत, पाठीत खाली वाकून दोन्ही हातांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. असे करताना पाय सरळ राहतील याची काळजी घ्या. ही क्रिया पाच-सहा वेळा करा. उतार वयात काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करता येतात. उतार वयात स्टॅटिक स्ट्रेचिंग उपयुक्त ठरते. ( Stretching )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news